मुलांच्या भाग्योदयासाठी आणि आरोग्यासाठी अंगारकी संकष्टी चतुर्थीला करा ‘हे’ चमत्कारी उपाय

आज (10 जानेवारी) रोजी वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. मंगळवारी चतुर्थी तिथी आल्यावर त्याला अंगारक चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी भक्तांसाठी शुभ आणि लाभदायी असते. शिवाय ही संकष्टी वर्षातील पहिली संकष्टी आहे. त्यामुळे संपूर्ण वर्ष सुखकर करण्यासाठी बाप्पाच्या भक्तांना आज चांगली संधी आहे. हिंदू परंपरेनुसार चतुर्थी महिन्यातून दोनदा येते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी साजरी केली जाते. भगवान गणेशाचा जन्म चतुर्थी तिथीला झाला म्हणून ही तिथी गणेशाला समर्पित आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते.

अंगारकी चतुर्थी हे नाव कसं पडलं?
अंगारकी चतुर्थीला गणेशाची विधीवत पुजा- अर्चना उपवास केला जातो. अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरुप चतुर्मुखी आणि चार हातांचे असते. गणेशाच्या या रुपाला ‘संकटमोचन गणेश’ असे म्हटले जाते. मंगळदेवाने श्री गणेशाचे तप केले होते त्यावेळी गणेश भगवान प्रसन्न झाले आणि जी चतुर्थी तिथी मंगळवारी येईल, त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखले जाईल असे वरदान दिले. त्यादिवसापासून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी चतुर्थी म्हणतात.

अंगारकी संकष्टी चतुर्थीला करा ‘हे’ चमत्कारी उपाय

Ganesh Chaturthi 2022: Dos and don'ts to follow while performing puja -  Hindustan Times

  • मुलांच्या भाग्योदयासाठी
    मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी आपल्या मुलांना सोबत घेऊन “ॐ गं गणपतये नमः” या मंत्राचा जप करा. त्यानंतर मुलांच्या हातून बाप्पाला दुर्वा आणि लाडू प्रसाद म्हणून अर्पण करा आणि तो प्रसादाचा लाडू नंतर मुलांना खाऊ घाला.
  • धन लाभासाठी
    धन लाभासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करा. बाप्पाला दुर्वाची माळ आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर श्री गणेश स्तोत्राचे पठण करा.
  • मुलांच्या आरोग्यासाठी
    मुलांचे आरोग्य सतत खराब होत असेल तर या दिवशी बाप्पा समोर चार मुखी दीवा लावा. तसेच बाप्पाला मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य अर्पण करा आणि “वक्रतुण्डाय हुं ” या मंत्राचा 108 वेळा जप करा.

अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त
अंगारकी चतुर्थी प्रारंभ : 10 जानेवारी दुपारी 12 : 09 पासून
अंगारकी चतुर्थी समाप्त : 11 जानेवारी दुपारी 2 : 31 पर्यंत
चंद्रोदयाची वेळ 10 जानेवारी रात्री 9.11 असणार आहे.