वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. प्रामुख्याने हा सण विद्यार्थी, कला, संगीत या क्षेत्राशी संबंधित लोक साजरा करतात. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सरस्वती देवीची पूजा-आराधना केली जाते. असं म्हणतात, या दिवशी सरस्वती देवीची पूजा केल्याने व्यक्ति बुद्धिमान आणि एकाग्र होतो.

यंदा 26 जानेवारीला साजरी केली जाणार वसंत पंचमी
हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. यंदा वसंत पंचमी 25 जानेवारी दुपारी 12:33 पासून सुरु होणार असून ती 26 जानेवारी 10:37 पर्यंत असेल.

वसंत पंचमीचा दिवशी विद्यार्थांसाठी खास असतो. असं म्हणतात या दिवशी जे विद्यार्थी देवी सरस्वतीची आराधना करतात त्यांना परिक्षेत उज्जल यश मिळण्यास मदत होते.

वसंती पचंमाला करा ‘हे’ उपाय

Basant Panchami 2023: बसंत पंचमी पर पीले रंग से कर लें ये अचूक उपाय, बुद्धि के साथ धन-दौलत में होगी बढ़ोतरी!

  • ज्योतिष शास्त्रानुसार, वसंत पंचमीला देवी सरस्वतीला लाडू किंवा बर्फीचा नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर ही मिठाई 7 लहान मुलींना वाटा ज्यामुळे देवी सरस्वतीसोबतच देवी लक्ष्मीची देखील कृपा प्राप्त होईल.
  • जर तुमचे मुल अभ्यात कमजोर असेल कर त्यांच्या हातून गरीब आणि गरजू व्यक्तीला केळ, डाळ, वस्त्र, पुस्तक दान करा. यामुळे देवी सरस्वतीची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होईल.
  • आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त करण्यासाठी देवी सरस्वती समोर दिवा लावून सरस्वती कवच आणि मंत्राचे पठण करा.
  • वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी देवी सरस्वतीच्या मूर्तीला दूधाने अभिषेक घाला.

हेही वाचा :

वसंत पंचमी का साजरी केली जाते? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पौराणिक कथा