Monday, May 29, 2023
घर मानिनी Religious आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक रविवारी करा 'हा' उपाय

आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक रविवारी करा ‘हा’ उपाय

Subscribe

हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतांना आणि ग्रहांना समर्पित केला जातो. रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो. सर्व नऊ ग्रहांपैकी सूर्य पहिला ग्रह मानला जातो. रविवारी सूर्यदेवाची पूजा केल्याने त्यांचा विशेष आशीर्वाद मिळतो. या दिवशी केलेले काही उपाय आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उत्तम मानले जातात. तसेच यामुळे आपल्या कुंडलीतील सूर्य ग्रह मजबूत होण्यास देखील मदत मिळते.

आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक रविवारी करा ‘हा’ उपाय

BBC Radio 4 - In Our Time, The Sun

  • रविवार हा सूर्यदेवाचा वार असल्याने या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम सूर्याचे दर्शन घ्यावे आणि त्याला तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य द्यावे. यामुळे शरीर निरोगी राहते. दृष्टी तीक्ष्ण होते असे म्हणतात.
  • रविवारी सूर्याच्या आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.
  • रविवारी माशांना पिठाचे गोळे बनवून खाऊ घालणे शुभ मानले जाते. यामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.
  • प्रत्येक रविवारी घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. तुपाचा दिवा लावल्याने सूर्यदेव तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होतात.
  • नोकरीत प्रगती होण्यासाठी रविवारी नदीत गूळ आणि तांदूळ मिसळून प्रवाहित करावे. यामुळे माणसाची प्रगती होते.
  • रविवारी वडाच्या पानावर आपली मनोकामना लिहून नदीच्या वाहत्या पाण्यात प्रवाहित केल्यास इच्छित फळ मिळते.

- Advertisement -

हेही वाचा :

रात्री झोपताना उशीखाली ‘या’ वस्तू ठेवल्यास होईल लाभ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini