Saturday, September 23, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा 'हे' उपाय

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Subscribe

ज्योतिष शास्त्रात  लक्ष्मी मातेला धन-संपत्तीची अधिष्ठात्री देवी मानलं जातं. त्यामुळे अनेकजण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करत असतात. आज आम्ही असेच काही प्रभावी उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धिचे वातावरण टिकून राहिल, शिवाय तुम्ही धनवान व्हाल.

या उपायांमुळे देवी लक्ष्मी होतील तुमच्यावर प्रसन्न

  • घरात दररोज सकाळ- संध्याकाळ कापूर जाळा, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वास करेल.
  • संध्याकाळी पूजेच्या वेळी राईच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात एक लवंग टाका. असं करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
  • दररोज पक्ष्यांना दाणे टाका, यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये घवघवीत यश मिळेल.
  • जेवण करताना कधीही पहिली पोळी गाई साठी बाजूला काढून ठेवा, तसेच पोळी करण्याआधी सुरूवातीला तव्यावर थोडे दूध शिंपडा यामुळे लक्ष्मी आणि अन्नपुर्णा तुमच्यावर खूश होईल. जेणेकरून तुम्हाला घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही.

हे उपाय आहेत अत्यंत लाभकारी

  • आठवड्यातून एकदा घरात गू्ग्गल धूप जरूर जाळा, हे खूप शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल.
  • प्रत्येक गुरूवारी तुळशीच्या रोपट्यावर दूध अर्पण करा. याउपायाने आर्थिक स्थैर्य लाभेल.
  • प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे शनि आणि मंगळ ग्रह शुभ फळ देतात.
  • देवी लक्ष्मीला खुश करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा-आराधना करा, यामध्ये गुलाबाच्या फुलांचा वापर करा. देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप, स्तोत्र पठण करा. तसेच देवी लक्ष्मीला खीर पुरीचा नैवेद्या दाखवा. यामुळे देवी लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील.
- Advertisement -

 


हेही वाचा :

हरतालिका व्रत कोणी करावे? वाचा ‘ही’ पौराणिक कथा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini