Tuesday, February 13, 2024
घरमानिनीReligiousवसंत पंचमीला करा 'या' वस्तूंचे दान; देवी सरस्वती होतील प्रसन्न

वसंत पंचमीला करा ‘या’ वस्तूंचे दान; देवी सरस्वती होतील प्रसन्न

Subscribe

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. यंदा वसंत पंचमी 14 फेब्रुवारी साजरी केली जाईल. प्रामुख्याने हा सण विद्यार्थी, कला, संगीत या क्षेत्राशी संबंधित लोक साजरा करतात. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सरस्वती देवीची पूजा-आराधना केली जाते. असं म्हणतात, या दिवशी सरस्वती देवीची पूजा केल्याने व्यक्ति बुद्धिमान आणि एकाग्र होतो.हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते.

वसंत पंचमीच्या दिवशी करा ‘हे’ दान

- Advertisement -
  • वसंत पंचमीचा दिवस देवी सरस्वतीला समर्पित आहे. त्यामुळे त्या दिवशी शिक्षणासंबंधित गोष्टींचे दान करणं शुभ मानलं जातं.
  • वसंत पंचमीच्या दिवशी गरजू विद्यार्थ्याला पुस्तक, वही यांसारख्या शैक्षणिक गोष्टी दान करा.
  • तसेच या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तू देखील दान करु शकता.
  • या दिवशी मंदिरात मोरपंख दान करणं देखील शुभ मानलं जातं.

वसंत पंचमीच्या दिवशी काय करु नये

  • वसंत पंचमीच्या दिवशी झाड किंवा झाडाची पाने तोडू नये.
  • तसेच या दिवशी मांसाहार देखील करु नये.
  • वसंत पंचमीचा दिवस खूप शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी घरामध्ये वादविवाद करु नका.

हेही वाचा :

वसंती पंचमी का साजरी केली जाते? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि कथा

- Advertisment -

Manini