Hindu Shastra : आज गुरूपुष्य योगात करा ‘या’ गोष्टींचे दान; मिळेल पुण्य आणि व्हाल धनवान

८ जुलै रोजी गुरू ग्रह वक्री होऊन मीन राशीमध्ये प्रवेश करतील. या योगामध्ये मांगलिक आणि शुभ कार्य करणं लाभदायक मानलं जात.

ज्योतिष शास्त्रानुसार गुरूपुष्य योग हा अत्यंत शुभ मानला जातो. हा योग खूप दुर्माळ आणि श्रेष्ठ मानला जातो. असं म्हणतात की, या दिवशी वस्तू खरेदी करणं तसेच दानधर्म करणं अत्यंत शुभ मानले जाते. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरूवारच्या दिवशी असते तेव्हा या दुर्मीळ योग निर्माण होतो. यावेळी २८ जुलै रोजी हा योग असणार आहे. तसेच या दिवशी दीप अमावस्या देखील आहे.

तसेच २८ जुलै रोजी गुरू ग्रह वक्री होऊन मीन राशीमध्ये प्रवेश करतील. या योगामध्ये मांगलिक आणि शुभ कार्य करणं लाभदायक मानलं जात. असं म्हणतात की, या योगामध्ये घर खरेदी करणं, दागिने खरेदी करणं शुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये यादिवशी दान करण्याचे देखील महत्व सांगण्यात आले आहे.

गुरू पुष्य योग तिथी
हिंदू पंचागानुसार, गुरूपुष्य योगाची सुरूवात
गुरूवारी २८ जुलै रोजी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांपासून ते
शुक्रवारी २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असणार आहे.

या वस्तूंचे दान केल्यास मिळेल पुण्य
ज्योतिष शास्त्रामध्ये गुरूपुष्य योगाला धार्मिक आणि आर्थिक लाभासाठी खूप शुभ मानले जाते. या दिवशी तांदूळ, खिचडी, डाळ, बंदीचा लाडू हे दान करणं शुभ मानलं जातं. तसेत या काळात खरेदी केलेल्या वस्तूमुळे आपल्याला भविष्यात खूप फायदे होतात.


हेही वाचा : Hindu Shastra : श्रावणात करा मोरपंखाचे ‘हे’ खास उपाय; मिळेल अद्भूत फळ