Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीReligiousEkadashi 2023 : आज भागवत एकादशीला 'या' गोष्टी खाणं वर्ज्य

Ekadashi 2023 : आज भागवत एकादशीला ‘या’ गोष्टी खाणं वर्ज्य

Subscribe

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला भागवत एकादशी साजरी केले जाते. आज 9 डिसेंबर रोजी भागवत एकादशीचे व्रत केले जाईल. एकादशीचे व्रत केल्याने श्री विष्णू प्रसन्न होतात. या दिवशी व्रतासोबतच श्री विष्णूंची पूजा-आराधना देखील करावी. तसेच काही नियमांचे पालन करावे.

एकादशीला खाऊ नये ‘या’ गोष्टी

  • शास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी कधीही भात खाऊ नये. असं म्हणतात की, जी व्यक्ती एकादशीच्या दिवशी भात खाते. त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा आर्शिवाद मिळत नाही. एकादशीच्या भात खाणं पाप मानले जाते.
  • शास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी कधीही मीठ खाऊ नये, अधवा कमी प्रमाणात खावे.
  • शास्त्रानुसार, एकादशीला हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व्रत मानले जाते, त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसाहार करू नये. सात्विक आहार घ्यावा.
  • एकादशीच्या दिवशी तांदूळ, मसूर डाळ, वांगे, मूळा, कांदा , लसूण यांचे सेवन करणे टाळावे.
  • या व्यतिरिक्त एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करु नये तसेच तुळशीची पाने तोडू नये.

हेही वाचा : आज उत्पत्ती एकादशीला अशी करा श्री विष्णूंची पूजा

Manini