हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. एकादशीचे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे. एकावर्षात 24 एकादशी येतात. प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी असते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. असं म्हटलं जात की, या व्रताचे पालन केल्याने सर्व दुःख, कष्ट आणि पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख-समृद्धी मिळते. एकादशीच्या दिवशी काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. असाच एक नियम म्हणजे एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये हा आहे.
भात न खाण्याचे धार्मिक कारण
पूर्वी पासून एकादशीच्या जे लोक उपवास करत नाहीत. त्यांनी निदान शुद्ध शाकाहारी अन्न सेवन करावे असे सांगितले जायचे. मात्र, आता या नियमासोबतच एकादशीच्या दिवशी भात का खाऊ नये? याचे धार्मिक कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पौराणिक कथेनुसार, देवी भगवतीच्या रागापासून वाचण्यासाठी महर्षी मेधा यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. त्यानंतर त्यांच्या शरीराचे अवयव पृथ्वीत लीन झाले. असे मानले जाते की, ते भाग पृथ्वीमध्ये मिसळल्यामुळे, तांदूळ वनस्पतीची उत्पत्ती पृथ्वीपासून झाली. यामुळेच तांदूळ हा वनस्पती नसून सजीव मानला जातो. ज्या दिवशी महर्षी मेधा यांनी देह सोडला होता त्या दिवशी एकादशी होती. त्यामुळे एकादशीला भात खाण्यास मनाई करण्यात आली आहे. असे मानले जाते की, एकादशीच्या दिवशी भात खाणे हे महर्षी मेधाचे रक्त आणि मांस खाण्यासारखे आहे.
वैज्ञानिक कारण
एकादशीला भात न खाण्यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे. तांदळात पाण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा स्थितीत चंद्राचा प्रभाव पाण्यात अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. जेव्हा व्यक्ती एकादशीच्या दिवशी भात खातो तेव्हा त्याच्या शरीराला भरपूर पाणी मिळते. अशा स्थितीत त्याचे मन चंचल आणि विचलित होते.