Thursday, April 18, 2024
घरमानिनीReligiousEkadashi 2024 : आज जया एकादशीला लक्ष्मी प्राप्तीसाठी करा 'हा' उपाय

Ekadashi 2024 : आज जया एकादशीला लक्ष्मी प्राप्तीसाठी करा ‘हा’ उपाय

Subscribe

प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हटले जाते. आज (20 फेब्रुवारी) रोजी जया एकादशीचे व्रत केले जाईल. जया एकादशी चे व्रत केल्याने मागील अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. जया एकादशीला श्री विष्णूंचे मनोभावे स्मरण केल्यास व्यक्तिच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतात. तसेच या दिवशी श्री विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

जया एकादशी मुहूर्त

एकादशी प्रारंभ : सोमवार, 19 फेब्रुवारी सकाळी 08:49 पासून
एकादशी समाप्त : मंगळवार, 20 फेब्रुवारी सकाळी 09:55 पर्यंत
उदय तिथीनुसार, एकादशीचे व्रत 20 फेब्रुवारी रोजी केले जाईल.

- Advertisement -

जया एकादशीला करा उपाय

  • श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी घरात तुळशीचे रोपटे लावल्याने श्री विष्णू प्रसन्न होतात. शिवाय तुळशीला देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते. एकादशीच्या दिवशी तुळस लावल्याने घरात सुख-शांती निर्माण होते.
  • या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून झाडाला परिक्रमा घाला. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

एकादशीची अशा प्रकारे करा पूजा

  • आज एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • स्वच्छ कपडे परिधान करून सूर्य देवाला अर्घ्यअर्पण करावे.
  • घरातील देवी-देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी. धूप-दीप लावून त्यांची आरती करावी.
  • पूजा पूर्ण झाल्यावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा, तसेच विष्णूच्या स्तोत्रांचे पठण करा.
    भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा.

हेही वाचा :

Mahashivratri 2024 : ‘या’ दिवशी साजरी केली जाईल महाशिवरात्री; ‘हा’ आहे शुभ मुहूर्त

- Advertisment -

Manini