हिंदू धर्म-पुराणांनुसार मार्गशीर्ष महिना श्रीकृष्णांना खूप प्रिय आहे. श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्याला देखील पवित्र मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. महाराष्ट्रातील अनेक सुवासिनी अगदी मनोभावे हे व्रत करतात.
यंदा 14 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार असणार आहे. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचा घट स्थापन केला जातो. त्याची पूजा करुन आरती केली जाते. पोथीवाचनही केले होते. या दिवशी उपवास केला जातो. संपूर्ण महिलावर्गासाठी आनंदी, उत्साही आणि भक्तीमय असा हा महिना असतो.
- Advertisement -
मार्गशीर्षातील गुरुवारचे व्रत कसे करावे
- या व्रतासाठी आंब्याचे डहाळे, पाच पत्री, पाच फळे, महालक्ष्मीसाठी सुवासिक वेणी, नारळ या गोष्टी मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी लागतात.
- सुरुवातीला आंब्याच्या डहाळे, चौरंगावर मांडलेला पाण्याने भरलेला कलशाची महालक्ष्मीच्या रूपात स्थापना केली जाते.
- या कलशाला सजवून आरास केली जाते. यानंतर स्तोत्र पठण, कथा वाचन,आरती, नैवेद्य दाखवला जातो.ॉ
- लक्ष्मीला गोडोधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कथा वाचतात. कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा महिलांकडून केली जाते.
- मार्गशीर्षातील दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पुजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी हळदी-कुंकू देऊन फळे तसेच इतर वाण दिले जाते.
हेही वाचा :