हनुमान चालिसाचे पठण करण्यापूर्वी करा ‘या’ नियमांचे पालन

हिंदू धर्मामध्ये व्रत वैकल्याला खूप महत्व दिले जाते. तसेच देवी-देवतांच्या पूजा-आराधनेकडे देखील विशेष लक्ष दिले जाते. भगवान हनुमानांची पूजा करण्यासाठी मंगळवार आणि शनिवारचा दिवस मुख्य मानला जातो. यामुळे हनुमानांची विशेष कृपा प्राप्त होते. शास्त्रामध्ये सांगण्यात आलंय की, हनुमान चालिसाचे नियमीत पठण केल्याने भगवान हनुमान लवकर आपल्यावर प्रसन्न होतात.

हनुमान चालिसेचे पठण केल्यास होते सर्व संकटांचे निवारण
हनुमान चालिसाचे पठण आपल्या संकल्पानुसार करतात. काही लोक नियमीत त्याचे पठण करतात. तर काहीजण मंगळवारी किंवा शनिवार आवर्जून पाठ करतात. असं म्हणतात की, हनुमान चालिसाच्या पठणाने व्यक्तीला मन शांती मिळते शिवाय त्याच्यावर येणारे प्रत्येक संकट नाहीसे होते.

हनुमान चालिसाचा पाठ करताना करा ‘या’ नियमांचे पालन

  • हनुमान चालिसाचा पाठ करताना तुमचे मन शांत असायला हवे. त्यावेळी फक्त हनुमान चालिसेवरच लक्ष केंद्रीत असावे.
  • हनुमान चालिसाचे पठण करताना आजूबाजूची जागा स्वच्छ आणि शुद्ध असावी.
  • हनुमान चालिसाचे पठण एका जागेवर बसूनच करावे.
  • हनुमान चालिसाचे पठण तुम्ही मंदिर, घर किंवा तीर्थ स्थळांवर देखील करु शकता.
  • हनुमान चालिसाचे पठण सकाळी किंवा संध्याकाळी करावे.
  • हनुमान चालिसाचे पठण करण्यापूर्वी दीवा प्रज्वलित करा.

 


हेही वाचा :

‘या’ दिवशी असणार पहिला मार्गशीर्ष गुरुवार; जाणून घ्या महत्व