Ganesh Chaturthi 2022 : ‘या’ तीन राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा

ज्योतिष शास्त्रानुसार, बुद्धिची देवता असणाऱ्या बाप्पाचा गणेश चतुर्थीच्या काळात हा राशींवर कृपा होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाचे स्वामी गणपती बाप्पा आहेत.

हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. या वर्षी 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.

हिंदू शास्त्रात गणपची बाप्पाला बुद्धिची देवता मानले जाते. तसेच कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी बाप्पाची आराधना केली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, बुद्धिची देवता असणाऱ्या बाप्पाचा गणेश चतुर्थीच्या काळात हा राशींवर कृपा होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाचे स्वामी गणपती बाप्पा आहेत. त्यामुळे ज्या राशीचे स्वामी बुध ग्रह आहेत. त्यांच्यावर नेहमीच बाप्पाचा आर्शिवाद असतो.

मेष
मेष राशींच्या व्यक्तींवर गणपती बाप्पाची विशेष कृपा असते. या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. मंगळ ग्रहाला साहस, परक्रमाचा कारक ग्रह मानले जाते. त्यामळे बाप्पाची या राशीवर कृपा असल्यास त्यांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते.

मिथुन
ज्योतिष शास्त्रानुसार, मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध ग्रहाला व्यापार, धन, तर्क, बुद्धि यांचे कारक मानले जाते. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींवर गणपती बाप्पाची विशेष कृपा असते.

कन्या
ज्योतिष शास्त्रानुसार, कन्या राशीचा स्वामी देखील बुध ग्रह आहे. या राशीचे लोक आयुष्यात खूप मोठे यश मिळवतात. या राशींच्या व्यक्तींवर गणपती बाप्पाची विशेष कृपा असते.


हेही वाचा :Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थी दिवशी अशी करा गणेश मूर्तीची स्थापना