घरगणेशोत्सव 2022Ganesh Chaturthi 2022 : घराच्या 'या' दिशेला ठेवा बाप्पाची मूर्ती

Ganesh Chaturthi 2022 : घराच्या ‘या’ दिशेला ठेवा बाप्पाची मूर्ती

Subscribe

राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. या वर्षी 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.

हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. या वर्षी 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.

31 ऑगस्टपासून सुरू होत असलेला गणेशोत्सव पुढील दहा दिवस साजरा केला जाईल. या काळात बाप्पाची मनोभावे सेवा पूजा केली जाते. परंतु कधीकधी या काळात अनेकजण गणेश मूर्तीची स्थापना करताना अनेक चूका करतात. घरामध्ये गणेश मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी योग्य दिशा या सर्व गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये गणपतीती मूर्ती ठेवण्याआधी योग्य वेळ आणि योग्य दिशा पाहायला हवी.

- Advertisement -

या दिशेला ठेवा गणेश मूर्ती
वास्तू शास्त्रानुसार, गणपती बाप्पा घराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेला ठेवण सर्वात उत्तम मानले जाते. परंतु जर ईशान्य दिशेला शक्य नसल्यास तुम्ही गणेश मूर्ती पूर्व दिशेस देखील ठेऊ शकता.

या दिशेला ठेऊ नका गणेश मूर्तीची स्थापना
घराच्या दक्षिण दिशेला कधीही गणेश मूर्तीची ठेऊ नका. तसेच घरातील शौचालय, स्टोर रूम, पायऱ्यांखाली कधीही गणेश मूर्तीची स्थापना करू नये.

- Advertisement -

या प्रकारच्या गणपतीची करा स्थापना

  • वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आणण्याआधी गणेश मूर्ती कशी असवी याची काळजी घ्या. गणेश मूर्ती ललितासनमध्ये बसलेला सर्वात शुभ मानले जाते. कारण ही मुद्रा शांत आणि शांतीचे प्रतीनिधित्व करते. याशिवाय गणपती आराम करत असताना अशी मूर्ती धनाचे प्रतीनिधित्व करते.
  • तसेच गणपतीची सोंड डाव्या दिशेला असावी.
  • गणपतीच्या हातात मोदक असायला हवा तसेच गणपतीच्या बाजूला उंदीर देखील असायला हवा.

हेही वाचा : Ganesh Chaturthi 2022 : ‘या’ तीन राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -