गणपतीला बुद्धी, सुख आणि समृद्धी प्रदान करणारी देवता म्हणून ओळखले जाते. पुढील काही तासातच बाप्पाचे घरोघरी आगमन होईल. संपूर्ण राज्यभरात पुढील 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोस असेल. या काळात गणपतीची विधीवत पूजा-आराधना केल्यास नक्कीच ते आपल्यावर प्रसन्न होतात. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण करा.
बाप्पाला ‘या’ 5 गोष्टी आहेत अतिशय प्रिय
मोदक
गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य अर्पण केल्यास ते नेहमी आपल्यावर प्रसन्न असतात. गणपतीला 21 किंवा 11 मोदकांचा नैवेद्य अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
दुर्वा
पौराणिक काळापासून गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केली जाते. गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करणं अत्यंत शुभ मानले जाते.
जास्वंद
गणपती बाप्पाला लाल रंगाचे जास्वंदाचे फुल देखील अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही त्यांना जास्वंदीचे फुल देखील अर्पण करू शकता.
अक्षता
गणपती बाप्पाला अक्षता देखील खूप प्रिय आहेत. त्यांच्या पूजेत अक्षतांचा वापर केल्यास त्यांचे शुभ फळ तुम्हाला नक्की प्राप्त होईल.
अष्टगंध
असं म्हणतात की, जर बाप्पाला दररोज अष्टगंध अर्पण केल्यास त्या व्यक्तिला शांती आणि समृद्धी मिळते. तसेच घरामध्ये सुख, समाधान प्राप्त होते. घरातील आर्थिक परिस्थिती देखील सुधारते.
हेही वाचा :