भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. बाप्पाचे आगमन होताच चैतन्यमय वातावरण निर्माण होते. यंदा तुम्ही तुमच्या राशीनुसार कशी मूर्ती बसवावी आणि कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या हे सांगणार आहोत.
राशीनुसार अशी बनवा मूर्ती
- मेष
मेष राशीच्या व्यक्तींनी घरामध्ये लाल रंगाच्या मूर्तीची स्थापना करावी. तसेच बाप्पाला लाडवांचा प्रसाद अर्पण करावा.
- वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्तींनी घरामध्ये श्वेत रंगाच्या मूर्तीची अथवा गुलाबी पितांबर नेसलेल्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करावी. बाप्पाला उकडीच्या मोदकाचा प्रसाद अर्पण करावा.
- मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींनी घरामध्ये हिरवे पितांबर नेसलेल्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करावी. बाप्पाला जास्तीत जास्त दुर्वा घालाव्या.
- कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींनी सफेद पितांबर नेसलेल्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करावी. बाप्पाला मोत्याची माळ घालावी.
- सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींनी नारंगी पितांबर नेसलेल्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करावी. बाप्पाला केशरी जास्वदं अर्पण करावी.
- कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींनी हिरवे पितांबर नेसलेल्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करावी. बाप्पाला दुर्वा आणि केळी अर्पण करावी.
- तूळ
तूळ राशीच्या व्यक्तींनी गुलाबी, चंदेरी पितांबर नेसलेल्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करावी. बाप्पाला रसगुल्ल्यांचा नैवेद्य दाखवावा.
- वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी लाल पितांबर नेसलेल्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करावी. बाप्पाला बर्फीचा नैवेद्य दाखवावा.
- धनू
धनू राशीच्या व्यक्तींनी पिवळे पितांबर नेसलेल्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करावी. बाप्पाला बुंदीचा नैवेद्य दाखवावा.
- मकर
मकर राशीच्या व्यक्तींनी हलक्या निळे पितांबर नेसलेल्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करावी. उकडीच्या मोकदाचा नैवेद्य दाखवावा.
- कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींनी जांभळे पितांबर नेसलेल्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करावी. बाप्पाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.
- मीन
मीन राशीच्या व्यक्तींनी पिवळे पितांबर नेसलेल्या मूर्तीची स्ठापना करावी. बाप्पाला बुंदीचा लाडू अर्पण करावा.
हेही वाचा :