यंदा 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. गणपतीची विधीवत पूजा-आराधना केल्यास नक्कीच ते आपल्यावर प्रसन्न होतात. मात्र, गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वी घर स्वच्छ करुन घरातील काही गोष्टी बाहेर काढायल्या हव्या, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते.
गणेश चतुर्थी सुरु होण्यापूर्वी करा ‘या’ गोष्टी
- बंद घड्याळ
वास्तु शास्त्रानुसार, घरामध्ये बंद घड्याळ ठेवल्यास वास्तूदोष निर्माण होतो. त्यामुळे जर घरात बंद घड्याळ असेल तर ते लगेच सुरु करावे नाहीतर घराबाहेर काढावे.
- जळमटं
नवरात्रीपूर्वी घरातील जळमटं, घुळ काढून संपूर्ण घर स्वच्छ करावे. यामुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते.
- देवी-देवातांची खंडीत मूर्ती किंवा फोटो
वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये कधीही देवी-देवतांची खंडीत मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. कारण यामुळे घरात दुर्भाग्य येते.
- फुटलेली काच
वास्तू शास्त्रानुसार, फुटलेली काच किंवा आरसा ठेवणं देखील अशुभ मानलं जातं. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.
- फाटलेली धार्मिक पुस्तकं
वास्तु शास्त्रानुसार, घरामध्ये कधीही फाटलेली धार्मिक पुस्तकं ठेऊ नये. यामुळे घरात सतत कलह निर्माण होतात.