यंदा 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं.
गणपतीची विधीवत पूजा-आराधना केल्यास नक्कीच ते आपल्यावर प्रसन्न होतात. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी त्यांना वेगवेगळी फुलं देखील अर्पण केले जातात. मात्र, कधी कधी कळत-नकळत बाप्पाच्या पूजेत आपल्याकडून एखादी चूक होऊ शकते. बाप्पाला लाल जास्वंदीचे फुल आवडत हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र त्यातील काही फुलं अशी देखील आहेत जी बाप्पाला आवडत नाहीत.
बाप्पाला कधीही अर्पण करू नका ‘या’ गोष्टी
- Advertisement -
- महादेवांना केतकीचे फुल आवडत नाही त्यामुळे बाप्पाला केतकीचे फुल आवडत नाही. त्यामुळे बाप्पाच्या पूजेमध्ये केतकीच्या फुलाचा वापर करू नये.
- बाप्पाला तुळशीचे पान देखील आवडत नाही. पौराणिक कथेनुसार, एके दिवशी तुळशीने गणपती बाप्पाला तिच्यासोबत विवाह करण्याची मागणी केली होती. तेव्हा गणपतीने तुळशीला शाप दिला होता. त्यामुळे बाप्पाच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही.
- पूजेमध्ये सुकलेल्या फुलांचा देखील कधीही वापर करू नका. सुखलेल्या फुलांमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
हेही वाचा : Ganesh Chaturthi 2023 : तुमच्या राशीनुसार निवडा बाप्पाची मूर्ती अन् दाखवा ‘हा’ नैवेद्य
- Advertisement -
- Advertisement -