भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. या वर्षी 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.
घरामध्ये गणेश मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी योग्य दिशेची विशेष काळजी घ्यायला हवी. वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये गणपतीती मूर्ती ठेवण्याआधी योग्य वेळ आणि योग्य दिशा पाहायला हवी.
या दिशेला ठेवा गणेश मूर्ती
वास्तू शास्त्रानुसार, गणपती बाप्पा घराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेला ठेवणं सर्वात उत्तम मानले जाते. परंतु जर ईशान्य दिशेला शक्य नसल्यास तुम्ही गणेश मूर्ती पूर्व किंवा उत्तर दिशेला देखील ठेऊ शकता.
या ठिकाणी ठेऊ नये मूर्ती
घराच्या दक्षिण दिशेला कधीही गणेश मूर्तीची ठेऊ नका. तसेच घरातील शौचालयाजवळ, स्टोर रूमजवळ तसेच पायऱ्यांखाली कधीही गणेश मूर्तीची स्थापना करू नये.
गणेश चतुर्थी तिथी
चतुर्थी तिथी प्रारंभ : 18 सप्टेंबर 2023 दुपारी 12:39 पासून
चतुर्थी तिथी समाप्त : 19 सप्टेंबर 2023 दुपारी 01:43 पर्यंत असेल. 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल.
पूजेचा शुभ मुहूर्त = सकाळी 11:19 ते दुपारी 01:43 असेल.
हेही वाचा :