भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. या काळात बाप्पाच्या आगमनापासून ते बाप्पाच्या विसर्जनापर्यंत अनेक प्रथा, परंपरा पाळल्या जातात.
बाप्पाची मूर्ती झाकून का आणावी?
गणपतीची मूर्ती घरी आणताना अनेकजण मूर्तीचे तोंड झाकून आणतात. पण शास्त्रानुसार यामागे कोणतेही धार्मिक कारण नाही. खरंतर, ही प्रथा आपोआप पडली असून सध्या अनेकजण ही प्रथा पाळतात. परंतु अनेकांच्या मते, बाप्पाची मूर्ती खूप मोहक आणि सुंदर असते. त्यामुळे मूर्ती घेऊन ती कोणत्याही वाईट भावनेने कोणी पाहू नये हा त्यामागचा उद्देश आहे. घरी नेताना रस्त्यात एखाद्याची वाईट भावना तिच्यावर पडू शकते. त्यामुळे मूर्ती झाकून नेली जाते.
मूर्ती घरी आणताना काय करावे?
मूर्ती विकत घेतल्यावर ती जागा मोकळी न ठेवता तिथे पैसे आणि सुपारी ठेवली जाते. शिवाय मूर्ती हातामध्ये घेणाऱ्या व्यक्तीने डोक्यावर टोपी घालावी.
हेही वाचा :