गुढीपाडवा या सणापासून हिंदू नव वर्षाला सुरुवात होते. हिंदू पंचागानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. यंदा 9 एप्रिल 2024 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या जल्लोषात हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाते. पारंपरिक मराठमोळी वेषभूषा, दागदागिने परिधान करत घरोघरी गुढी उभारत, गोडाधोडाचा स्वयंपाक करत नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. मुंबईसह राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या देखावे आणि शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला जातो.
गुढीपाडवा शुभ मुहूर्त
यंदा 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 8 एप्रिल 2024 रोजी रात्री 11:50 पासून सुरु होईल आणि 9 एप्रिल 2024 रोजी रात्री 8:30 वाजता समाप्त होईल. तसेच गुढीच्या पूजेसाठी सकाळी 6:02 ते 10:16 पर्यंतची वेळ शुभ असेल.
या पद्धतीने साजरा केला जातो गुढीपाडवा
मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. चैत्र महिन्याची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढ्या उभारतात. यासाठी उंच काठीला रेशमाच्या खणाची घडी अथवा नवी कोरी साडी बांधतात. यावर चांदीचा अथवा तांब्याचा गडू उपडा घालतात. त्यावर कडूलिंबाची दहाळी व आंब्याची पाने व साखरेच्या गाठी फुलांचा हार गुढीला चढवतात. व घराबाहेरील एका उंच ठिकाणी गुढी उभारतात आणि तिची पूजा करतात.
हेही वाचा :