रामनवमी झाल्यानंतर काहीच दिवसात रामभक्त श्री हनुमानांची जयंती साजरी केली जाते. हिंदू पुराणांनुसार, चैत्र पौर्णिमेला श्री हनुमानांचा जन्म झाला होता. संपूर्ण भारतात या दिवशी भगवान हनुमानांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केला जाणार आहे.ज्याप्रकारे श्रीरामांना विष्णू अवतार मानले जाते. त्याचप्रकारे श्री हनुमानांना शिव अवतार मानले जाते. असं म्हणतात की, श्री हनुमान भगवान शंकराचे अकरावे अवतार होते. म्हणजेच श्री हनुमानांमध्ये महादेवाचा अंश आहे.
श्री हनुमानांच्या जन्माचे रहस्य?
पौराणिक कथेनुसार, श्री हनुमान हे भगवान महादेवाचे अवतार मानले जातात, कारण श्री हनुमानांची आई अंजनी यांनी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करुन पुत्रप्राप्तीचे वरदान मागितले होते. तेव्हा भगवान शंकराने पवनदेवाच्या रूपात आपल्या रौद्र शक्तीचा अंश यज्ञकुंडात अर्पण केला आणि ती शक्ती अंजनीच्या गर्भात गेली. त्यानंतर चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमानजींचा जन्म झाला. भगवान शंकाराचा अंश आणि वायू देवाचा आशीर्वाद असल्याने हनुमानांना पवनपुत्र हनुमान देखील म्हटले जाते.
कथेनुसार, रावणाचा अंत करण्यासाठी श्री विष्णूंनी श्रीरामाचा अवतार घेतला त्यावेळीसर्व देवांनी रामाची सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या रूपात अवतार घेतले होते. त्याच वेळी भगवान शंकरांनी हनुमान हा त्यांचा अकरावा रुद्र अवतार घेतला. या रूपात भगवान शंकरानेही रामाची सेवा केली आणि रावणाला मारण्यात मदत केली.
हेही वाचा :