Thursday, June 8, 2023
घर मानिनी Religious शनीची साडेसाती सुरू आहे? शनिवारी करा 'हे' उपाय

शनीची साडेसाती सुरू आहे? शनिवारी करा ‘हे’ उपाय

Subscribe

हिंदू धर्म आणि ज्योतिष शास्त्रानुसार शनी देवांना न्यायाचे दैवत मानले जाते. माणसाच्या चांगल्या-वाईट कर्माचे फळ शनी देव सर्वांना देतात. ज्योतिषशास्त्रात शनि देवांना (ग्रहाला) खूप महत्त्व दिले जाते. असं म्हणतात की, शनिदेव जितके रागीट आहेत, तितकेच ते दयाळू सुद्धा आहेत. चांगले कर्म करणाऱ्या लोकांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत, मात्र दुसऱ्यांना विनाकारण छळणाऱ्या शनिदेव चांगलीच शिक्षा देतात.

याशिवाय ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी ग्रह शुभ असेल तर अशी व्यक्ती राजसुख प्राप्त करते. मात्र ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती, महादशा सुरु आहे त्यांना खूप त्रास भोगावा लागतो.

- Advertisement -

त्यामुळे अशा व्यक्तींनी शनीच्या साडेसाती आणि महादशेमध्ये प्रत्येक शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनिदेवांचे दर्शन घ्यावे. शनिदेवांचे दर्शनाने तुमच्या अडचणींवर मात व्हायला सुरूवात होऊ शकते. तसेच काही खास प्रत्येक शनिवारी काही खास उपाय केल्यावर देखील तुम्हाला अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.तसेच शनिच्या साडेसातीचा किंवा महादशेचा त्रासही भोगावा लागणार नाही.

शनिच्या साडेसातीपासून वाचण्यासाठी ‘हे’ उपाय महत्त्वाचे

- Advertisement -

Shani Idol At Home: क्यों नहीं रखी जाती घर में शनि देव की मूर्ति? | why shani dev idol is not kept in house | HerZindagi

प्रत्येक शनिवारी शनीदेवांच्या मंदिरात जाऊन शनी देवांचे दर्शन घ्यावे आणि शनि चालिसेचे पठण करावे.

या दिवशी शनिच्या बीज मंत्राचा जप करावा.

शनिवारी श्री हनुमानाची पूजा-आराधना केल्याने देखील शनी देव प्रसन्न होतात. या दिवशी हनुमान चालिसेचे पठण केल्याने शनी आणि हनुमान या दोन्ही देवतांची कृपा प्राप्त करता येते.

भगवान शंकर शनीदेवांचे गुरू आहेत. त्यामुळे भगवान शंकरांची आराधना केल्याने तुम्हाला शनी देवांचा आर्शिवाद सुद्धा प्राप्त होऊ शकतो. प्रत्येक शनिवारी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करा.

Shani Jayanti, Sani Dev Jayanti 2022, Lord Shani, Pillai Center

शनिवारी लोखंड, काळी वस्तू , छत्री, उडीद डाळ, चमड्यीची चप्पस कधीही खरेदी करू नये.

शनिवारी गव्हाचे दळण केल्याने घरात सुख – समृद्धी प्राप्त होते.

शनिवारी विणाकारण खोटे बोलू नये, तसेच शनिवारी कोणत्याही व्यक्तीला त्रास देऊ नये.

शनिवारी संध्याकाळी काळ्या कुत्र्याला किंवा गाईला पोळी खाऊ घातल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच या दिवशी झाडू खरेदी करणं शुभ मानले जाते.

 


हेही वाचा :

रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी करा ‘या’ नियमांचे पालन

- Advertisment -

Manini