दूध फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाही तर आध्यात्मिकदृष्ट्या देखील महत्त्वपूर्ण मानले जाते. हिंदू धर्मात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अनेकजण शिवलिंगावर कच्च्या दूधाचा अभिषेक करतात. वास्तू शास्त्रातही दूधाबाबत अनेक शुभ-अशुभ संकेत जोडले जातात. खरंतर, दूधाला चंद्राचे कारक मानले जाते. त्यामुळे जर हे सतत खाली सांडत असेल तर त्याचा अशुभ प्रभाव कुटुंबावर होऊ शकतो.
वास्तू शास्त्रानुसार, जर गॅसवरील तापणारे दूध सतत ऊतू जात असेल तर हा अशुभ संकेत आहे. यामुळे कुटुंबात अनेक समस्या निर्माण होतात.
उकळते दूध सतत ऊतू जाणे
- Advertisement -
- वास्तू शास्त्रानुसार, गॅसवरील दूध सतत ऊतू जाणे अशुभ मानले जाते. कारण जेव्हा दूध ऊतू जाते तेव्हा ते खाली सांडते आणि वाया जाते. दूध वाया गेल्याने चंद्राचा अशुभ प्रभाव पडतो. ज्यामुळे मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या आपले नुकसान होते. शिवाय याच्या प्रभावाने कुटुंबात सतत कलह निर्माण होतात.
- तसेच गॅसवर दूध तापण्यासाठी अग्नीचा वापर केला जातो. अग्नी हे मंगळ ग्रहाचा कारक आहे. मंगळ आणि चंद्र एकमेकांच्या विरुद्ध मानले जातात. ज्यामुळे दूध ऊतू जाणे कुटुंबासाठी कलहदायक मानले जाते.
- खरंतर, दूध उकळल्यानंतर ऊतू जाणे सामान्य असू शकते. मात्र, जर ते वारंवार ऊतू जात असल्यास घरामध्ये काहीतरी वास्तुदोष असल्याचे दर्शवते.
- उकळते दूध सांडणे हे आरोग्य समस्या देखील दर्शवते. शिवाय यामुळे देवी अन्नपूर्णा देखील आपल्यावर नाराज असतात.
- Advertisement -
हेही वाचा :