Saturday, February 17, 2024
घरमानिनीReligiousKaal Bhairav Jayanti 2023 : कधी आहे कालभैरव जयंती? जाणून घ्या शुभ...

Kaal Bhairav Jayanti 2023 : कधी आहे कालभैरव जयंती? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Subscribe

यंदा 5 डिसेंबर रोजी काळभैरव जयंती साजरी केली जाणार आहे. कालभैरव हे भगवान शंकरांच्या रुद्र अवतारातील एक स्वरुप आहे. त्यामुळेच काळभैरव जयंती शिव भक्त मोठ्या आनंदाने साजरी करतात.

कालाष्टमीचे काय आहे महत्व

धार्मिक मान्यतेनुसार, कालाष्टमीच्या दिवशी भगवान भैरव यांचे व्रत आणि पूजन केले जाते. असं म्हणतात की, कालभैरवांच्या पूजा-आराधनेने साधकाला सर्व प्रकारच्या भयापासून मुक्ती मिळते. सोबतच रोगांपासून देखील मुक्ती मिळते. भगवान भैरव आपल्या भक्तांचे नेहमी संरक्षण करतात. त्यांच्या उपासनेने नकारात्मक शक्ती देखील नष्ट होण्यास मदत मिळते.

- Advertisement -

कालभैरव जयंती तिथी

यंदा कालभैरव जयंती मंगळवार, 5 डिसेंबर रोजी असणार आहे. या दिवशी कालभैरव जयंतीच्या तिथीची सुरुवात सोमवार, 04 डिसेंबर रोजी रात्री 09:59 वाजता सुरु होईल आणि 5 डिसेंबर रोजी रात्री 12:37 वाजता समाप्त होईल. काल भैरव जयंतीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त रात्री 11:45 ते 12:39 पर्यंत आहे.

कालभैरव जयंतीला काय करावे?

kalbhairav Ashtami- Things to know - AstroTalk Blog - Online Astrology Consultation with Astrologer

- Advertisement -

 

  • या दिवशी कालभैरवांसोबतच भगवान शंकर आणि देवी दुर्गाची देखील पूजा केली जाते.
  • या दिवशी भैरव मंदिरामध्ये शेंदूर, राईचे तेल, नारळ, चने दान करावे.
  • या दिवशी कालभैरवांच्या मूर्ती किंवा फोटो समोर राईच्या तेलाचा दिवा लावून श्री काल भैरव अष्टकाचे पठण करा.
  • या दिवशी काळ्या कुत्र्याला गोडी चपाती खाऊ घाला.

हेही वाचा :

शुभ कार्याच्या सुरुवातीला नारळ का फोडला जातो? जाणून घ्या कारण

- Advertisment -

Manini