महादेवांच्या क्रोधातून प्रकट झाले काळभैरव रुप; जाणून घ्या पौराणिक कथा

कालभैरव भगवान शंकरांच्या रुद्र अवतारातील एक आहे. त्यामुळेच कालाष्टमी देखील शिव भक्त आनंदाने साजरी करतात. प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी असते. या महिन्यातील 16 नोव्हेंबर कालाष्टमीला असणार आहे. तसेच या दिवशी कालभैरव जयंती देखील साजरी करण्यात येईल.

कालाष्टमीचे काय आहे महत्व
धार्मिक मान्यतेनुसार, कालाष्टमीच्या दिवशी भगवान भैरव यांचे व्रत आणि पूजन केले जाते. असं म्हणतात की, कालभैरवांच्या पूजा-आराधनेने साधकाला सर्व प्रकारच्या भयापासून मुक्ती मिळते. सोबतच रोगांपासून देखील मुक्ती मिळते. भगवान भैरव आपल्या भक्तांचे नेहमी संरक्षण करतात. त्यांच्या उपासनेने नकारात्मक शक्ती देखील नष्ट होण्यास मदत मिळते.

कालभैरव जयंती शुभ मुहूर्त
यंदा कालभैरव जयंती बुधवार, 16 नोव्हेंबर रोजी असणार आहे. या दिवशी कालभैरव जयंतीची सुरुवात सकाळी 5:49 पासून होणार आहे तसेच समाप्ती 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:57 पर्यंत होईल.

जाणून घ्या पौराणिक कथा
पौराणिक मान्यतेनुसार, महादेवांच्या रागातून काळभैरव अवतार प्रकट झाला. एका पौराणिक कथेनुसार, एके दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांमध्ये तिघांमधील त्यांच्या पूजनीय आणि सर्वश्रेष्ठ कोण आहे असा वाद सुरू झाला. यावेळी स्वर्गातून इतर देवतांना देखील बोलवण्यात आले आणि त्यांना देखील या प्रश्नाचे उत्तर विचारण्यात आलं. याचदरम्यान महादेव आणि ब्रह्मामध्ये वाद सुरु झाला. याचं वादात महादेवांना प्रचंड राग आला आणि त्यांनी रुद्र रुप धारण केले. असं म्हणतात की, त्याच रुद्र रुपातून काळभैरवाचा जन्म झाला होता.

तसेच आणखी एका प्रचलित कथेनुसार, जेव्हा देवी सतीने राज दक्षच्या यज्ञामध्ये आत्मदहन केले होते त्यावेळी महादेवांनी रागातून काळभैरव प्रकट झाले होते. काळभैरवाने राजा दक्षला शिक्षा केली. तेव्हापासून काळभैरवाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या वाईट शक्तिंचा नाश होत अशी मान्यता प्रचलित झाली.


हेही वाचा :

कधी आहे कालभैरव जयंती? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी