Vastu Tips : तिजोरीमध्ये ठेवा ‘ही’ गोष्ट भासणार नाही पैशांची कमतरता

कुंडलीत अशुभ शनि असल्यास तो पैसा, मान-सन्मान, आरोग्य, वैवाहिक जीवनात कलह यांसारख्या अनेक अडचणी निर्माण करतो.

ज्योतिष शास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्त्व दिले जाते. आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा शनि ग्रहाशी संबंध असतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि अशुभ असेल तर ,त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक प्रकारचे संघर्ष करावे लागतात. कुंडलीत अशुभ शनि असल्यास तो पैसा, मान-सन्मान, आरोग्य, वैवाहिक जीवनात कलह यांसारख्या अनेक अडचणी निर्माण करतो. त्यामुळे जर कुंडलीत शनिची महादशा चालू असेल तर शनि ग्रहाच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी हे ज्योतिष शास्त्रीय उपाय नक्की करून पहा.

घोड्याची नाल करेल चमत्कारी फायदे

  • शनिच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी शनि ग्रहाशी संबंधीत गोष्टी दान करण्याचा सल्ला दिला जातो.
    याशिवाय घोड्याची नाल सुद्धा शनि ग्रहाशी संबंधीत समस्या दूर करण्यास मदत करते.
  • शनि दोष कमी करण्यासाठी तुम्ही मधल्या बोटामध्ये घोड्याच्या नालेची अंगठी घालू शकता.
  • तसेच घराबाहेर किंवा तुमच्या दुकानाबाहेर घोड्याची नाल लावणे शुभ मानले जाते. या उपायामुळे कुटुंबातील व्यक्तींची भरभराट होते.

तिजोरीमध्ये ठेवा घोड्याची नाल

  • घरात पैशांची अडचण असेल तर तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये घोड्याची नाल ठेवा. या उपायामुळे नक्कीच तुमची आर्थिक परीस्थिती सुधारण्यास मदत होईल.
  • तिजोरीमध्ये घोड्याची नाल ठेवल्यास तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. शनि देव सुद्धा तुम्हाला शुभ आर्शिवाद देतील.

 


हेही वाचा :

Vastu Tips : पूजेमध्ये का गरजेचा आहे शंख? जाणून घ्या प्रकार आणि फायदे