घरभक्तीKharmas 2021 : सुर्याचा धनु राशीत प्रवेश, खरमासात शुभ कार्य करावे का?

Kharmas 2021 : सुर्याचा धनु राशीत प्रवेश, खरमासात शुभ कार्य करावे का?

Subscribe

जेव्हा सूर्य धनु राशीत प्रवेश करतो तेव्हापासून खरमास सुरु होते. यंदा १६ डिसेंबरला सूर्य धनु राशीत पोहोचताच खरमास सुरू झाला आहे. या दरम्यान लग्न, मुंज, साखरपुडा अशी कोणतीही शुभ कार्ये केली जात नाहीत. यंदा १६ डिसेंबर २०२१ पासून ते १४ जानेवारी २०२२ पर्यंत खरमास हा काळ मानला जाणार आहे. त्यामुळे सर्व शुभ कार्य महिनाभरासाठी लांबणीवर जाणार आहेत.

सूर्यदेव विश्वाभोवती फिरतात

ज्योतिषाचार्यांच्या मते धर्मग्रंथानुसार, सूर्यदेव विश्वाभोवती फिरत असतो, त्या दरम्यान त्याला थांबण्याची परवानगी नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, सूर्य देव निसर्गाच्या नियंत्रणाखाली कार्य करतो. यामुळे सूर्यदेव थांबू शकत नाहीत. सूर्य थांबला तर संपूर्ण विश्व थांबेल. यामुळे सर्व जगात हाहाकार माजेल. मात्र, सतत सूर्य प्रदक्षिणा करत असल्याचे त्याच्या रथाचे घोडे थकतात.

- Advertisement -

हे पाहून सूर्यदेवाने एकदा घोडे विसाव्यासाठी तलावाजवळ सोडले आणि खर रथात बांधून ब्रह्मांडाची प्रदक्षिणा सुरू केली. त्याचवेळी खारचा वेग मंदावल्याने एक महिन्याचे आवर्तन कसेबसे पूर्ण झाले. यानंतर पुन्हा घोडे बांधून प्रदक्षिणा करू लागेल. यासाठी दरवर्षी खरमास पाळला जातो.

अध्यात्मिक कार्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चांगला काळ

ज्योतिष शास्त्रामध्ये, गुरु आणि सूर्य हे अनुकूल ग्रह असल्याचे सांगितले आहे. सूर्य हा आत्म्याचा कारक ग्रह आहे आणि गुरु हा धर्माचा कारक ग्रह आहे जो भगवान विष्णूचा प्रतिनिधी मानला जातो. म्हणून जेव्हा जेव्हा सूर्य गुरु राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा काळ सांसारिक कार्यांपासून मन वळवून आध्यात्मिक कार्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे.

- Advertisement -

मकर संक्रांतीपासून शुभ कार्यास होईल सुरुवात

मलमासाच्या काळात अनेक शुभ आणि धार्मिक कार्यांना केले जात नाहीत. यात विवाह, गृहप्रवेश, लग्न, मुंज, साखरपुडा, नामकरण विधी इत्यादी करत नाहीत. या काळात लोक पूजा आणि अनेक गोष्टी करण्यापासून स्वतःला परावृत्त करतात. १४ जानेवारीला मकर संक्रांत आल्याने सर्व कामे पुन्हा सुरु केली जातात. लग्नाचे मुहूर्तही सुरू होतात.

हे आहेत लग्नाचे शुभ मुहूर्त:

जानेवारी- १६, २१, २२. २३, २४ आणि २५, २७

फेब्रुवारी – ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १८, १९, २० आणि २२

मार्च – ४ मार्च आणि ९ मार्च हे लग्नासाठी शुभ मुहूर्त आहेत. यानंतर होलाष्टक लावले जाईल.

एप्रिल – १४ ते २७ एप्रिल

मे – अक्षय तृतीयेसोबत लग्नासाठी शुभ मुहूर्त आहे.

मलमासात लग्न, मुंडण, गृहप्रवेश असे कोणतेही शुभ कार्य नाही. आता लोकांना महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -