ग्रहांचा राजा सूर्य बदलणार तुमचे आयुष्य, ‘या’ राशींना होणार दुप्पट फायदा

महिन्यातील १५ जून २०२२ रोजी सूर्य मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे

ज्योतिष शास्त्रानुसार सूर्यचे एका महिन्यानंतर राशी परिवर्तन होते. याप्रकारे ते पूर्ण एक वर्ष म्हणजेच १२ महिन्यांत १२ राशीमध्ये प्रवेश करतात. या महिन्यातील १५ जून २०२२ रोजी सूर्य मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याला साहस, आत्मविश्वास, मान-सम्मान , आरोग्य यांचा कारक ग्रह आहे. कुंडलीतील सूर्याची मजबूत स्थिती व्यक्तीला त्याच्या करिअरमध्ये खूप यश आणि पद-प्रतिष्ठा देखील मिळवून देते.

या राशीच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

 • वृषभ
  सूर्याचे गोचर वृषभ राशीच्या जातकांसाठी आर्थिक परिस्थिती सुधारणारे असेल. वृषभ राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते किंवा प्रमोशन होऊ शकते.
 • सिंह
  सिंह राशीचे स्वामी स्वतः सूर्यदेव आहेत. त्यामुळे हे राशीपरिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम सिद्धा होणार आहे. या व्यक्तींना आर्थिक लाभ होईल. तसेच समाजात यांचा मान-सम्मान देखील वाढेल.
 • मकर
  मकर राशीमध्ये सूर्याचे गोचर जबरदस्त फायदा मिळवून देईल. तुमच्यामध्ये भरपूर साहस आणि आत्मविश्वास असेल. तुमचे सर्व कर्ज कमी होईल. तसेच यश प्राप्त होईल.
 • कुंभ
  सूर्याचे गोचर कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ फळ देणारे असेल. नव्या नोकरीचा शोध पूर्ण होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल. तुमचे वैवाहिक आयुष्य देखील सुखी राहिल.