Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Religious krishna janmashtami 2023 : बाळकृष्णाला राशीनुसार अर्पण करा वस्त्र आणि नैवेद्य

krishna janmashtami 2023 : बाळकृष्णाला राशीनुसार अर्पण करा वस्त्र आणि नैवेद्य

Subscribe

श्रावण महिना सुरू झाला की नागपंचमी आणि रक्षाबंधननंतर कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्वपूर्ण मानले जाते. या दिवशी रात्री बारा वाजता श्री कृष्णाची विधीवत पुजा केली जाते. बाळकृष्णासाठी सुंदर पाळणा तयार केला जातो. बाळकृष्णाला पाळण्यात घालण्याआधी त्याला सजवले जाते. सुंदर वस्त्र परिधान केले जातात. यंदा तुम्ही तुमच्या राशीनुसार श्री कृष्णाला कोणत्या रंगाचे वस्त्र अर्पण करायचे आणि कोणता नैवेद्य दाखवायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बाळकृष्णाला राशीनुसार अर्पण करा वस्त्र आणि नैवेद्य

  • मेष
- Advertisement -

मेष राशीच्या व्यक्तींनी बाळ कृष्णाला लाल रंगाची वस्त्र अर्पण करावी. त्याचप्रमाणे कुंक वाहून ऊँ कमलनाथाय नम: मंत्र म्हणावा. दह्याचा नैवेद्य दाखवावा.

  • वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींनी बाळकृष्णाला चांदीचे वर्क असलेले दागिने घालावे आणि गुलाबी रंगाचे वस्त्र अर्पण करावे. तसेच श्रीकृष्णाष्टकचा जप करावा. त्याचप्रमाणे दही किंवा रसगुल्ल्याचा नैवेद्य दाखवावा.

  • मिथुन
- Advertisement -

मिथुन राशीच्या व्यक्तींना बाळकृष्णाला हिरव्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. त्याचप्रमाणे चंदनाचा टिळा लावून ऊँ गोविंदाय नम: मंत्र म्हणावा. या राशीच्या लोकांनी बाळकृष्णाला बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

  • कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींनी कृष्णाला सफेद रंगाचे वस्त्र अर्पण करुन दूधाचा नैवेद्य दाखवून राधाष्टक मंत्र म्हणावा.

  • सिंह

या राशीच्या व्यक्तींनी बाळकृष्णाला नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करुन अष्टगंधाचा टिळा लावावा. त्याचप्रमाणे ऊँ कोटी सूर्य संप्रयाय नम: मंत्र म्हणून. दही,पंच मेवा आणि बेलाचे फळ अर्पण करुन नैवेद्य दाखवावा.

  • कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींनी बाळकृष्णाला हिरव्या किंवा पोपटी रंगाचे वस्त्र परिधान करुन माव्याची बर्फी,केसर दूधाचा नैवेद्य दाखवून ऊँ देवकीनंदनाय नम: मंत्र म्हणावा.

Top 20 Beautiful Lord Krishna Images - Wordzz

  • तुळ

तुळ राशीच्या लोकांनी बाळ कृष्णाला गुलाबी रंगाची वस्त्र अर्पण करावी. त्याचप्रमाणे ऊँ लीलाधघराय नम: या मंत्र म्हणून दह्याचा नैवेद्य दाखवावा.

  • वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी बाळकृष्णाला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करुन बासूंदीचा नैवेद्य दाखवावा आणि ऊँ बराहाय नम: मंत्र म्हणावा.

  • धनु

धनु राशीच्या व्यक्तींनी बाळकृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करुन बदाम हलव्याचा नैवेद्य दाखवावा आणि ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम: मंत्र म्हणावा.

  • मकर

मकर राशीच्या व्यक्तींनी बाळकृष्णाला हलक्या निळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. त्यानंतर खसखस आणि धने एकत्र करुन त्याचा नैवेद्य दाखवावा. या राशीच्या व्यक्तींनी ऊँ नमो कृष्ण वल्लभाय नम: मंत्र म्हणावा.

  • कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींनी बाळकृष्णाला गडद निळ्या रंगाची वस्त्र आणि बालूशाहीचा नैवेद्य दाखवावा आणि ऊँ नमो कृष्ण वल्लभाय नम: मंत्र म्हणावा.

  • मीन

मीन राशीच्या व्यक्तींनी पिवळ्या रंगाची वस्त्र बाळकृष्णाला परिधान करावी. तसेच केशर बर्फी,जिलेबी किंवा केळ्याचा नैवेद्य दाखवून ऊँ नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणावा.


हेही वाचा :

krishna janmashtami 2023 : ‘या’ दिवशी साजरी केली जाणार कृष्णाष्टमी; वाचा शुभ मुहूर्त आणि तिथी

- Advertisment -

Manini