‘या’ चार राशींवर चंद्रग्रहण पडणार भारी, तुमची रास कोणती?

ज्योतिषांच्या मते बुद्ध पौर्णिमा आणि चंद्र ग्रहण असे दोन अद्भूत योग या दिवशी असतील. जवळपास ८० वर्षांनंतर हा दुर्मिळ योग बनणार आहे.

पुढील काही दिवसांमध्ये वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण लागणार आहे. हे चंद्र ग्रहण सोमवार दिनांक १६ मे रोजी लागणार आहे. ज्योतिषांच्या मते, हे चंद्र ग्रहण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी विशाखा नक्षत्रावर वृश्चिक राशीमध्ये लागेल. वैशाख पौर्णिमेला ‘बुद्ध पौर्णिमा’ सुद्धा साजरी केली जाते. ज्योतिषांच्या मते बुद्ध पौर्णिमा आणि चंद्र ग्रहण असे दोन अद्भूत योग या दिवशी असतील. जवळपास ८० वर्षांनंतर हा दुर्मिळ योग बनणार आहे. ८ दशकानंतर बनण्याऱ्या या दुर्मिळ संयोगाने या ४ राशीच्या लोकांना सांभाळून राहण्याचा सल्ला दिला आहे.

या ४ राशींनी रहा सावधान

कर्क
वर्षाच्या पहिल्या चंद्र ग्रहणावर कर्क राशीच्या लोकांना सावध राहायला हवं. मुलांशी संबंधीत समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच मुलांच्या करिअर आणि आरोग्यासाठी हे ग्रहण चांगले सिद्ध होत नाही. चंद्रामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. खर्च वाढून आर्थिक परिस्थिती बिघडू शकते.

तूळ
वर्षाच्या पहिल्या चंद्र ग्रहणावर तूळ राशीच्या लोकांना सांभाळून रहायला हवं. अतिउत्साह तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेऊ नका. बोलण्यावर संयम ठेवा.

धनू
कोणत्याही प्रकारच्या वाद विवादात अडकल्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा कमी होऊ शकते. बोलण्यावर संयम न ठेवल्याने मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते. खर्च वाढतील.

मकर
मकर राशीच्या लोकांसाठी सुद्धा हे चंद्र ग्रहण नुकसानकारक असेल. शनि देव तुमचे राशी स्वामी आहेत. तसेच या राशिमध्ये सध्या शनीची साडेसाती सुद्धा चालू आहे. त्यामुळे मकर राशीच्या लोकांना सावध रहायला हवे. पैश्यांच्या देवाण घेवाणीपासून सावध रहा.