Wednesday, February 28, 2024
घरमानिनीReligiousMaghi Ganesh Jayanti : 'या' दिवशी साजरी केली जाणार माघी गणेश जयंती

Maghi Ganesh Jayanti : ‘या’ दिवशी साजरी केली जाणार माघी गणेश जयंती

Subscribe

प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. असं म्हणतात की, जो व्यक्ती या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. यंदा मंगळवार, 13 फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. तसेच या दिवशी मंगळवार असल्याने गणेश जयंतीचे महत्त्व आणखी वाढले आहे.

गणेश जयंती तिथी

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 05 : 44 पासून सुरु होणार असून मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 दुपारी 02 : 41 वाजेपर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार, 13 फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल.

- Advertisement -

गणेश पूजा मुहूर्त : 13 फेब्रुवारी 2024 सकाळी 11:40 वाजेपासून दुपारी 01:58 वाजेपर्यंत असेल.

गणेश जयंतीची पूजा

Ganesh Chaturthi Puja Vidhi Your worship is incomplete without these things

- Advertisement -

मराठी महिन्यातील माघ महिन्यात शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते, म्हणून त्याला माघी गणेश जयंती असे म्हणतात. गणेश जयंती दिवशी हळद किंवा शेंदुर याने गणपतीची मूर्ती बनवण्याची प्रथा आहे. उत्तर प्रदेशमध्ये गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी म्हटले जाते. या जयंतीला तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी गणपतीला तिळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो.

काही घरांमध्ये भाद्रपद महिन्याप्रमाणेच माघी गणेशोत्सवामध्ये गणपतीची मूर्ती घरी आणली जाते. त्याची मनोभावे सेवा केली जाते. घरी आलेले गणपती त्याच दिवशी विसर्जित केले जातात.

‘या’ दिवशी श्रीगणेशाची पूजा करण्याचे महत्त्व

अग्नि पुराणात या दिवसाबद्दल उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्रीगणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. गणेश जयंतीचे व्रत आणि पूजा केल्याने संकटांचा नाश होतो. यासोबतच या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या दूर होतात.


हेही वाचा :

श्री रामाच्या सुंदर नावांवरून निवडा बाळासाठी ‘हे’ खास नाव

- Advertisment -

Manini