Sunday, February 11, 2024
घरमानिनीReligiousMaghi Ganesh Jayanti : 'या' कारणामुळे साजरा केला जातो माघी गणेशोत्सव

Maghi Ganesh Jayanti : ‘या’ कारणामुळे साजरा केला जातो माघी गणेशोत्सव

Subscribe

प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. यंदा मंगळवार, 13 फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. असं म्हणतात की, जो व्यक्ती या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीप्रमाणेच माघी गणेश जयंतीला महत्व प्राप्त आहे.

माघी गणेशोत्सव का साजरा केला जातो?

गणपति फोटो वास्तु टिप्स: घर के लिए कौन सी गणेश मूर्ति सबसे अच्छी है?

- Advertisement -

हिंदू ग्रंथानुसार, श्री गणेशांनी तीन अवतार घेतले होते. त्यांनी घेतलेल्या या तिन्ही अवतारांची उत्पत्ती वेगवेगळी आहे. बाप्पाने पहिला अवतार वैशाख पौर्णिमेला घेतला होता. या दिवशी विनायक जयंती साजरी केली जाते. तर बाप्पाने दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घेतला. या दिवशी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेश जयंती साजरी केली जाते. तर बाप्पाने घेतलेल्या तीन अवतारांपैकी तिसऱ्या अवताराचा जन्म माघी चतुर्थीला झाला. त्यामुळे या दिवशी माघी गणेशोत्सव साजरा केला जातो.

गणेश जयंती तिथी

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 05 : 44 पासून सुरु होणार असून मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 दुपारी 02 : 41 वाजेपर्यंत असणार आहे.

- Advertisement -

उदयतिथीनुसार मंगळवार, 13 फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. तसेच या दिवशी मंगळवार असल्याने गणेश जयंतीचे महत्त्व आणखी वाढले आहे.

गणेश पूजा मुहूर्त : 13 फेब्रुवारी 2024 सकाळी 11:40 वाजेपासून दुपारी 01:58 वाजेपर्यंत असेल.

‘या’ दिवशी श्रीगणेशाची पूजा करण्याचे महत्त्व

अग्नि पुराणात या दिवसाबद्दल उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्रीगणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. गणेश जयंतीचे व्रत आणि पूजा केल्याने संकटांचा नाश होतो. यासोबतच या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या दूर होतात.

 


हेही वाचा :

Maghi Ganesh Jayanti : ‘या’ दिवशी साजरी केली जाणार माघी गणेश जयंती

- Advertisment -

Manini