महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. हिंदू धर्मात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. यंदा शुक्रवार, 8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल. परंतु महादेवाची पूजा-आराधना करताना काही नियम पाळले जातात. नाहीतर महादेव तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
महादेवाच्या पूजेत करु नका ‘या’ चुका
- Advertisement -
- शास्त्रानुसार, महादेवाची पूजा करताना कधीही शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा घालू नये. शिव लिंगाची नेहमी पूर्ण परिक्रमा घालावी.
- शिवपिंडीवर अभिषेक करताना कधीही शंखाचा वापर करु नये. पौराणिक कथेनुसार, महादेवाने शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे पूजेत शंखाचा वापर अशुभ मानला जातो.
- महादेवाला बेलपत्र खूप प्रिय आहे. परंतु तुटलेले, फाटलेले बेलपत्र कधीही शिवलिंगावर अर्पण करु नये.
- महादेवाची पूजा करताना हळद, कुंकू अर्पण करणे टाळावे.
- महादेवाच्या पिंडीवर केतकीचे फुल देखील कधी अर्पण करु नये. पौराणिक कथेनुसार, केतकीच्या फुलाला महादेवांनी शाप दिला होता.
- शिवपिंडीवर चुकूनही तुळशीपत्र अर्पण करु नये.
महाशिवरात्री पूजा विधि
- या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून घरातील पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश स्थापित करावा.
यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मूर्तीची स्थापना करा. - त्यानंतर अक्षत, पान, सुपारी, रोळी, मोली, चंदन, लवंग, वेलची, दूध, दही, मध, तूप, धतुरा, बेलपत्र, कमलगट्टा इत्यादी देवाला अर्पण करा.
- महादेवाच्या स्तोत्रांचे आणि मंत्राचे पठण करा आणि आरती करा.
- फाल्गुन महिन्यात येणारी महाशिवरात्री ही वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री मानली जाते.
हेही वाचा :