Thursday, April 18, 2024
घरमानिनीReligiousMahashivratri 2024 : 'या' दिवशी साजरी केली जाईल महाशिवरात्री; 'हा' आहे शुभ...

Mahashivratri 2024 : ‘या’ दिवशी साजरी केली जाईल महाशिवरात्री; ‘हा’ आहे शुभ मुहूर्त

Subscribe

हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्वपूर्ण मानले जाते. दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघतात. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री 8 मार्च रोजी साजरी केली जाईल. या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. जो भक्त या दिवशी व्रत करुन महादेवाचे मनोभावे स्मरण करतो. त्याच्या महादेव नेहमी प्रसन्न असतात.

महाशिवरात्र तिथी

महाशिवरात्र तिथीची सुरुवात : 8 मार्च संध्याकाळी 09:57 पासून
महाशिवरात्र तिथीची समाप्ती : 9 मार्च संध्याकाळी 06:17 पर्यंत

- Advertisement -

शिव पूजन प्रदोष काळात करणं उत्तम मानले जाते. त्यामुळे शुक्रवार, 8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल.

शिव पूजन शुभ मुहूर्त

8 मार्च रोजी भगवान शंकराच्या पूजेचा शुभ मुहूर्ताची वेळ संध्याकाळी 06:25 ते 09:28 पर्यंत आहे. तसेच चार प्रहरांचा शुभ मुहूर्तावर देखील तुम्ही पूजा करु शकता.

- Advertisement -

महाशिवरात्री 2024 चार प्रहर शुभ मुहूर्त

पहिला प्रहर : संध्याकाळी 06:25 ते रात्री 09:28
दुसरा प्रहर : रात्री 09:28 ते रात्री 12:31
तिसरा प्रहर : मध्यरात्री 12:31 ते मध्यरात्री 3:34
चौथा प्रहर : पहाटे 03.34 ते सकाळी 06:37 पर्यंत

महाशिवरात्री पूजा विधि

  • या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून घरातील पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश स्थापित करावा.
  • यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मूर्तीची स्थापना करा.
  • त्यानंतर अक्षत, पान, सुपारी, रोळी, मोली, चंदन, लवंग, वेलची, दूध, दही, मध, तूप, धतुरा, बेलपत्र, कमलगट्टा इत्यादी देवाला अर्पण करा.
  • महादेवाच्या स्तोत्रांचे आणि मंत्राचे पठण करा आणि आरती करा.
  • फाल्गुन महिन्यात येणारी महाशिवरात्री ही वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री मानली जाते.

हेही वाचा :

‘या’ दिवशी वर्षातले पहिले चंद्रग्रहण; ‘या’ राशींना होणार फायदा

- Advertisment -

Manini