makar sankranti 2022 : मकर संक्रांतीला ‘या’ गोष्टींचे न चुकता करा दान; संकटातून मुक्ती अन् भरभराट होणार

जीवनातील अनेक त्रासातून मुक्ती मिळत घरात सुखसमृद्धी आणि भरभराटीचे वातावरण निर्माण होते. जाणून घेऊया कोणत्या गोष्टींचे दान करणे शुभ आहे.

makar sankranti 2022 donate these things on makar sankranti you will get freedom from pain of shani and rahu
makar sankranti 2022 : मकर संक्रांतीला या गोष्टींचे न चुकता करा दान, संकाटातून मुक्ती होत भरभराट होईल

मकर संक्रांत हा हिंदूंचा मुख्य सण आहे. पौष महिन्यातील या दिवशी उत्तरायण करुन सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यंदा मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी होणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान पुण्य कर्म यासारख्या कार्यांना विशेष महत्त्व असते. हा सण वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य इतर दिवसांच्या तुलनेत अनेक पटीने असते असे मानले जाते. या दिवशी केलेल्या दानामुळे संकाटातून मुक्ती होत भरभराट होईल तर शनि आणि राहूच्या त्रासापासून मुक्ती मिळते. तसेच जीवनातील अनेक त्रासातून मुक्ती मिळत घरात सुखसमृद्धी आणि भरभराटीचे वातावरण निर्माण होते. जाणून घेऊया कोणत्या गोष्टींचे दान करणे शुभ आहे.

खिचडी

मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी दान करणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी खिचडी खाणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी गरजू व्यक्तीला भात आणि उडीदाच्या डाळीची खिचडी दान केली जाते. असे मानले जाते की खिचडी दान केल्याने शनि दोष दूर होतात तर सुखदायी जीवन लाभते.

गूळ

या दिवशी गुळाचे दान करणे शुभ असते. याच्या दानाने सूर्यदेव प्रसन्न होतात असे मानले जाते. यंदा गुरुवारी मकर संक्रांतीचा सण असल्याने गुळाचे दान केल्याने गुरु कृपा प्राप्त होईल असे मानले जाते. यादिवशी तुम्ही तीळ आणि गूळापासून बनवलेले लाडू दान करु शकतात.

तेल

मकर संक्रांतीच्या दिवशी तेल दान करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की तेल दान केल्याने शनिदेवाची कृपा होते.

तीळ

या दिवशी तिळाचे दान करा. कारण या दिवशी भगवान विष्णू, सूर्य आणि शनिदेव यांचीही तिळाने पुजा केली जाते. शनी देवाने आपले संपप्त पिता सूर्यदेवाची काळ्या तिळाने पूजा केली, ज्यामुळे सूर्य देव प्रसन्न झाले, त्यामुळे मकर संक्रांतीला तीळ दान करत तुम्ही शनिच्या साडेसातीपासून मुक्ती मिळवू शकता.

तूप

मकर संक्रांतीच्या दिवशी तूप दान केल्याने करिअरमध्ये प्रगती होते. कारण सूर्य आणि गुरुला संतुष्ट करण्यासाठी तूप खूप शुभ मानले जाते. त्यामुळे मकर संक्रांतीला तूप दान केल्यास घरात सुख, समृद्धी संपत्तीची भरभराट होते असे मानले जाते.

अन्नधान्य

या दिवशी पाच प्रकारचे धान्य दान करावे. याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

घोंगडी, वस्त्र

मकर संक्रांतीच्या दिवशी गरजवंतांना काळ्या रंगाची घोंगडी दान कराव्यात. यामुळे शनि आणि राहूच्या दोषांपासून मुक्ती मिळते. तसेच यादिवशी वस्त्र दान करणेही शुभ मानले जाते. यामुळे घरात समृद्धी नांदते. या दिवशी कपडे दान करण्यास महादान असे म्हटले जाते.


makar sankranti 2022 : यंदाची मकर संक्रात ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुखदायक