देशभरात यंदा मकर संक्रांत हा सण 14 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. यादिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याचा हा राशी बदल खूप खास आणि अनेकांसाठी सुखदायक असतो. कारण सूर्य हा सर्व राशींचा राजा मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याच्या राशी बदलामुळे खरमास संपेल आणि वसंत ऋतुच्या आगमानला सुरुवात होईल. मकर संक्रांतीचा अद्भूत संबंध महाभारत काळाशी जोडला जातो. कारण 58 दिवस बाणाच्या शय्येवर राहिल्यानंतर भीष्म पितामह यांनी आपल्या देहत्याग करण्यासाठी सूर्य उत्तरायणात येण्याची वाट पाहिली होती, नेमकी ही आख्यायिका काय आहे जाणून घेऊ…
महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देहत्याग करणासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडल होता. 18 दिवस चाललेल्या महाभारताच्या युद्धात भीष्म पितामह 10 दिवस कौरवांच्या वतीने लढले होते. रणांगणात भीष्म पितामहांचे युद्धकौशल्य पाहून पांडव अचंबित झाले होते. यावेळी पांडवांनी भीष्माला शिखंडीच्या सहाय्याने धनुष्य सोडण्यास भाग पाडले आणि अर्जुनाने एकामागून एक अनेक बाण मारून त्याला धरतीवर पाडले. मात्र भीष्म पितामह यांना इच्छा मृत्यूचे वरदान मिळाले होते, त्यामुळे अर्जुनाच्या बाणांनी जखमी होऊनही ते वाचले. दरम्यान भीष्म पितामह यांनी हस्तिनापूर चारी बाजूंनी सुरक्षित होत नाही तोपर्यंत मरणार नाही अशी शपथ घेतली होती. यासोबतच भीष्म पितामहने प्राण सोडण्यासाठी सूर्य उगवण्याची वाट पाहिली. कारण या दिवशी प्राण सोडणाऱ्यांना मोक्ष मिळतो असा समज होता. गीतेतही जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते. असे म्हटले आहे. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतात म्हणून हा दिवस लोकं आनंद- उत्साहात साजरा करतात.
भगवान श्रीकृष्णांनी सांगितले महत्त्व
ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान श्रीकृष्णांनी उत्तरायणाचे महत्त्व सांगताना सांगितले होते की, 6 महिन्यांच्या शुभ कालावधीत जेव्हा सूर्यदेव उत्तरायण असतात आणि धरती (पृथ्वी) प्रकाशमय होते, त्यावेळी देह त्याग करणाऱ्या व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही. असे लोक थेट ब्रह्माची प्राप्ती करतात, म्हणजेच मोक्ष प्राप्त करतात. यामुळेच भीष्म पितामहांनी देह त्याग करण्यासाठी सूर्य उत्तरायण होईपर्यंत वाट पाहिली.
मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त
ज्योतिषशास्त्रानुसार, मुहूर्त चिंतामणी ग्रंथानुसार मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त सूर्याच्या शुभ मुहूर्ताच्या 16 तास आधी आणि 16 तासांनंतरचा आहे. यावेळी पुण्यकाल 14 जानेवारीला सकाळी 7.15 वाजल्यापासून सुरू होईल, जो संध्याकाळी 5:44 पर्यंत चालेल. त्यात स्नान, दान, नामजप करता येतो. दुसरीकडे, स्थिर विवाह महापुण्य काल मुहूर्त 9 ते 10:30 पर्यंत राहील. यानंतर दुपारी 1.32 ते 3.28 पर्यंत मुहूर्त असेल.