Friday, April 19, 2024
घरमानिनीReligiousMakar Sankranti 2024 : संक्रांतीचे पौराणिक महत्त्व काय? 'या' दिवशीच भीष्म पितामहांनी...

Makar Sankranti 2024 : संक्रांतीचे पौराणिक महत्त्व काय? ‘या’ दिवशीच भीष्म पितामहांनी केला होता देहत्याग

Subscribe

देशभरात यंदा मकर संक्रांत हा सण 15 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. यादिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याचा हा राशी बदल खूप खास आणि अनेकांसाठी सुखदायक असतो.  मकर संक्रांतीचा अद्भूत संबंध महाभारत काळाशी जोडला जातो. कारण 58 दिवस बाणाच्या शय्येवर राहिल्यानंतर भीष्म पितामह यांनी आपल्या देहत्याग करण्यासाठी सूर्य उत्तरायणात येण्याची वाट पाहिली होती. ही नेमकी पौराणिक कथा काय आहे हे आज याबातमीच्या माध्यमातून सांगणार आहोत.

संक्रांतीच्या दिवशी भीष्म पितामहांनी केला देहत्याग

Policies of Bhishma Pitamah: Difficult circumstances are included in the  rule of this life cycle | भीष्म पितामह की नीतियां: मुश्किल हालात इस जीवन  चक्र के नियम में हैं शामिल - Dainik Bhaskar

- Advertisement -

महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देहत्याग करणासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडल होता. 18 दिवस चाललेल्या महाभारताच्या युद्धात भीष्म पितामह 10 दिवस कौरवांच्या वतीने लढले होते. रणांगणात भीष्म पितामहांचे युद्धकौशल्य पाहून पांडव अचंबित झाले होते. यावेळी पांडवांनी भीष्माला शिखंडीच्या सहाय्याने धनुष्य सोडण्यास भाग पाडले आणि अर्जुनाने एकामागून एक अनेक बाण मारून त्याला धरतीवर पाडले. मात्र, भीष्म पितामह यांना इच्छा मृत्यूचे वरदान मिळाले होते, त्यामुळे अर्जुनाच्या बाणांनी जखमी होऊनही ते वाचले. दरम्यान भीष्म पितामह यांनी हस्तिनापूर चारी बाजूंनी सुरक्षित होत नाही तोपर्यंत मरणार नाही अशी शपथ घेतली होती. यासोबतच भीष्म पितामहने प्राण सोडण्यासाठी सूर्य उगवण्याची वाट पाहिली. कारण या दिवशी प्राण सोडणाऱ्यांना मोक्ष मिळतो असा समज होता. गीतेतही जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते. असे म्हटले आहे. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतात म्हणून हा दिवस लोकं आनंद- उत्साहात साजरा करतात.

भगवान श्रीकृष्णांनी सांगितले महत्त्व

ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान श्रीकृष्णांनी उत्तरायणाचे महत्त्व सांगताना सांगितले होते की, 6 महिन्यांच्या शुभ कालावधीत जेव्हा सूर्यदेव उत्तरायण असतात आणि धरती (पृथ्वी) प्रकाशमय होते, त्यावेळी देह त्याग करणाऱ्या व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही. असे लोक थेट मोक्ष प्राप्त करतात. यामुळेच भीष्म पितामहांनी देह त्याग करण्यासाठी सूर्य उत्तरायण होईपर्यंत वाट पाहिली.

- Advertisement -

मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त

ज्योतिष शास्त्रानुसार, मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सकाळी 08 : 30 वाजता सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. मकर संक्रांतचा पुण्यकाळ मुहूर्त 15 जानेवारी सकाळी 06 : 50 पासून संध्याकाळ 05: 34 पर्यंत असेल. तर महापुण्यकाळ सकाळी 06 : 50 पासून सकाळी 08 : 38 पर्यंत असेल. पुण्यकाळ आणि महापुण्यकाळामध्ये स्नान-दान करणं शुभ मानले जाते.


हेही वाचा :

Makar Sankranti 2024 : यंदा घोड्यावर स्वार होऊन येणार संक्रांती, पण काळा रंग असणार वर्ज्य

- Advertisment -

Manini