घरभक्तीmakar sankranti -भोगीची भाजी रेसिपी

makar sankranti -भोगीची भाजी रेसिपी

Subscribe

संक्रांतीच्या आदल्यादिवशी भोगी असते. संक्रातीएवढेच भोगीलाही महत्व आहे. यादिवशी खास मिक्स भाजी केली जाते. तिला भोगीची भाजी असे म्हटले जाते. या दिवशी महाराष्ट्रात आणि इतर काही राज्यांमध्ये घराघरात भोगी साजरी केली जाते. भोगीची भाजी, बाजरीची तीळ भाकरी आणि मुगाची किंवा उडदाची खिचडी यादिवशी आवर्जून केली जाते. त्याचा नैवैद्य दाखवला जातो.

भोगीची भाजी
साहीत्य-चिमूटभर हिंग, चार वांगी चिरलेली, पाव वाटी सोललेला हिरवा वाटाणा, पाव वाटी कापलेले गाजर, पाव वाटी सोललेले हिरवे हरभरे, पाव वाटी भिजवलेले कच्चे शेंगदाणे, पाव वाटी तेल, २ बारीक चिरलेले कांदे, दोन चमचे गरम मसाला, पाव वाटी खिसलेले खोबरं, चवीपुरते मीठ, चार चमचे तीळ, चवीपुरता गूळ

- Advertisement -

कृती : सर्वप्रथम एका पातेल्यात तेल तापवा. तेल तापले की त्यात कांदा लालसर परतून घ्या. नंतर हिंग, हळद घाला. चिरलेल्या भाज्या तेलात परतून घ्या. नंतर त्यात तिखट, मीठ, गरम मसाला पावडर, तीळ, खोबरं घालून मिश्रण एकजीव करा. गूळ घाला. प्रमाणात पाणी घालून शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर घालून सजवा. भोगीची ही भाजी ,बाजरीची भाकरी असा नैवेद्य घरोघरी केला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -