नुकताच श्रावण महिना सुरु झाला असून येत्या 21 ऑगस्ट रोजी म्हणजेच श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाईल. हिंदू धर्मात नागपंचमीचं विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. पौराणिक काळापासून नाग देवतेला पूजनीय मानले जाते. त्यामुळे श्रावणात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करतात. तसेचा या दिवशी सापाची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्प दोष कमी होतो. यंदाची नागपंचमी विशेष खास असणार आहे कारण या दिवशी पहिला श्रावणी सोमवार देखील असेल.
नागपंचमी तिथी
नागपंचमी तिथी 21 ऑगस्ट रात्री 12 : 21 पासून सुरु होणार असून 22 ऑगस्ट दुपारी 2 वाजेपर्यंत असेल. त्यामुळे नागपंचमी 21 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.
नागपंचमीचा शुभ योग
नागपंचमीचा सण पहिला श्रावणी सोमवारी येत असून मंगळवारी या सणाची सांगता होणार आहे. या खास दिवशी महादेवांसोबत नागाचे देखील पूजन केले जाईन. सोमवारी भगवान शंकराची विधिवत पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी मंगळागौर देखील साजरी केली जाईल ज्यामुळे नागदेवतेसह शिव आणि पार्वतीची विधिवत पूजा केल्यास अनेक पुण्य फळे प्राप्त होतील.