श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. हिंदू धर्मात नागपंचमीचं विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. पौराणिक काळापासून नाग देवतेला पूजनीय मानले जाते. त्यामुळे श्रावणात हा सण साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास केला जातो. मात्र, यामागे नक्की काय कारण आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नागपंचमीला भावासाठी उपवास का करावा?
नागपंचमीशी संबंधित अनेक कथा आहेत. ज्यात सत्येश्वरी देवीची कथा देखील आहे. सत्येश्वरीला एक भाऊ होता. सत्येश्वर असे त्याचे नाव होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वरचा अकस्मित मृत्यू झाला. भावाच्या विरहामुळे सत्येश्वरी दु:खी होती. तिने अन्नत्याग केला होता. त्याचवेळी तिला सत्येश्वर नागरुपात दिसला. त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला. सत्येश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल, असे नागदेवतेने वचन तिला दिले. तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या.
नागपंचमी तिथी
नागपंचमी तिथी 21 ऑगस्ट रात्री 12 : 21 पासून सुरु होणार असून 22 ऑगस्ट दुपारी 2 वाजेपर्यंत असेल. त्यामुळे नागपंचमी 21 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.
नागपंचमी पूजा विधी
- नागपंचमीच्या दिवशी अनेक जण व्रत ठेवतात. त्याचप्रमाणे नागाची पूजा देखील केली जाते.
- नागपंचमीची पूजा करण्यासाठी नागाचे चित्र किंवा मातीपासून तयार केलेली नागाची मूर्ती चौरंगावर ठेवावी.
- नागाची पूजा करण्याआधी शिवपिंडीचे देखील पूजा करावी.
- त्यानंतर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून नागाची पूजा करावी.
- त्यानंतर नागाला कच्चे दूध, तूप, साखर एकत्र करुन त्याचा नैवेद्य दाखवावा.
- नंतर नाग देवतेची आरती करुन नागपंचमीची कथा वाचावी.
हेही वाचा :