श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. हिंदू धर्मात नागपंचमीचं विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. हिंदू धर्मात पौराणिक काळापासून नाग देवतेला पूजनीय मानले जाते. त्यामुळे श्रावणात हा सण साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेच्या प्रतिमेवर दूध अर्पण केले जाते आणि तसेच त्यांची पूजा-आराधना ही केली जाते. या वर्षी नागपंचमीचा सण 21 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.
नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने आपल्या कुंडलीतील कालसर्प दोष कमी होतो तसेच कुंडलीतील अनेक समस्या देखील कमी होतात. त्यामुळे नागपंचमीला या सात प्रमुख नागांची पूजा केली जाते.
शेषनाग
पौराणिक मान्यतेनुसार, शेषनागाला पाताळ लोकाचा म्हटले जाते. असं म्हणतात की, यांच्याच फनावर धरती विराजमान आहे. शेषनाग हे भगवान विष्णू यांचे सेवक आहेत. रामायणात लक्ष्मण हे शेषनागाचा अवतार होते. तर महाभारतामध्ये बलराम यांना शेषनागाचा अवतार मानले जात होते. शेषनाग हे कश्यप ऋषी आणि कद्रू यांचा पुत्र आहे.
वासुकी
भगवान शंकरांनी त्यांच्या गळ्यात वासुकी नाग परिधान केला आहे. समुद्र मंथना वेळी वासुकी नागलाच पर्वता भोवती गुंडाळले होते.
तक्षक
महाभारतात शमीक मुनिंच्या शापामुळे तक्षक नागाने राजा परिक्षीतला दंश केला होता. राजाचा मृत्यू होताच बदला घेण्यासाठी राजाच्या मुलाने सगळ्या सापांचा नाश करण्यासाठी मोठा यज्ञ केला होता. मात्र, ब्रह्म देवांच्या वरदानामुळे आस्तिक मुनिंनी हा यज्ञ समाप्त करून नागांचे प्राण वाचवले. या दिवशी श्रावण पंचमी होती. त्यामुळे या दिवशी नाग पंचमी साजरी केली जाते.
कर्कोटक
नागराज कर्कोटक याने जनमेजयच्या नाग यज्ञापासून वाचण्यासाठी भगवान शंकरांची स्तुति केली होती.
पद्म
धार्मिक मान्यतेनुसार, पद्म नाग गोमती नदीजवळ नेमिश क्षेत्रावर असायचा. त्यानंतर तो मणिपुरमध्ये गेला असल्याचे म्हटले जायचे.
कुलिक
कुलिक नागाला ब्राम्हण कुळातील मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, यांचा संबंध ब्रह्म देवाशी आहे.
शंख
हा नाग इतर नागांच्या तुलनेत खूप हुशार मानले जाते.