Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious 'या' दिवशी साजरी केली जाणार नागपंचमी; जाणून घ्या शुभ मूहूर्त

‘या’ दिवशी साजरी केली जाणार नागपंचमी; जाणून घ्या शुभ मूहूर्त

Subscribe

श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. हिंदू धर्मात नागपंचमीचं विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. हिंदू धर्मात पौराणिक काळापासून नाग देवतेला पूजनीय मानले जाते. त्यामुळे श्रावणात हा सण साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेच्या प्रतिमेवर दूध अर्पण केले जाते आणि तसेच त्यांची पूजा-आराधना ही केली जाते. या वर्षी नागपंचमीचा सण 21 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.

या वर्षी नागपंचमी सोमवार , 21 ऑगस्ट रोजी असणार आहे तसेच या दिवशी श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार देखील असणार आहे. त्यामुळे यंदाची नागपंचमी अत्यंत खास असून या दिवशी नाग देवतेसोबतच भगवान महादेवांची देखील पूजा केली जाईल.

नागपंचमी शुभ मूहूर्त

- Advertisement -

Nag Panchami 2020

सोमवार , 21 ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाईल.
नागपंचमी तिथी सुरुवात : 21 ऑगस्ट दुपारी 12:21 वाजता
नागपंचमी तिथी समाप्ती : 22 ऑगस्ट दुपारी 2 पर्यंत
नागपंचमी पूजा मुहूर्त : सकाळी 5:53 ते 8:30 पर्यंत

अशी करा नागपंचमीची पूजा

- Advertisement -

नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेचा फोटो किंवा मूर्ती घरी घेऊन या. त्याला घराच्या देवघराजवळ पाटावर त्याची स्थापना करा. त्यानंतर नाग देवतेला हळद-कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करून धूप-दीप लावून पूजा करा. लाह्या, बत्तासे, दूध नैवेद्य म्हणून अर्पण करा. त्यानंतर नाग देवतेची आराधना करा आणि नागपंचमीच्या कथेचे वाचन करा. त्यानंतर नाग देवतेची आरती करा.सोबतच भगवान शंकरांची सुद्धा आरती करा.


हेही वाचा :

Vastu Tips : ‘या’ दिशेला लावा 7 धावत्या घोड्यांचा फोटो; आर्थिक स्थिती होईल मजबूत

- Advertisment -

Manini