हिंदू धर्मातील सर्व देवी-देवतांमध्ये श्री गणेशांनी प्रथम पूजनीय मानले जाते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशांची पूजा-आराधना केली जाते. श्री गणेशांना आपल्या वास्तूमध्ये देखील महत्त्वापूर्ण मानले जाते. घरातील अनेक वास्तू दोष आपण श्री गणेशांच्या मूर्ती किंवा फोटोद्वारे सहज दूर करु शकतो. परंतु त्यापूर्वी श्री गणेशांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवण्याची योग्य दिशा तुम्हाला ठाऊक असायला हवी.
घरामध्ये श्री गणेशांची मूर्ती/ फोटो ठेवण्यापूर्वी पाळा ‘हे’ नियम
- श्री गणेशांची मूर्ती/फोटो घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.
- गणपतीच्या मूर्ती किंवा फोटोतील त्याची सोंड नेहमी डाव्या बाजूला असावी.
- घराच्या बाथरुमच्या आस-पासच्या भींतीवर कधीही श्री गणेशाची मूर्ती/ फोटो ठेऊ नये.
- घरात नेहमी बसलेल्या गणपतीची मूर्ती/ फोटो ठेवावा. तर कार्यालयात उभ्या गणपतीची मूर्ती/ फोटो ठेवणं शुभ मानलं जातं.
- घराच्या बाहेर चौकटीवर कधीही गणपतीची मूर्ती/ फोटो लावू नये. कारण, यामुळे आपल्या घराकडे गणपतीची पाठ होते. जे वास्तू शास्त्रात योग्य मानलं जात नाही.
- Advertisement -
हेही वाचा :
Vastu Tips : रात्री झोपण्यापूर्वी करा हे एक काम; आयुष्यभरासाठी व्हाल मालामाल
- Advertisement -
- Advertisement -