Friday, April 19, 2024
घरमानिनीReligiousNirjala Ekadashi 2023 : निर्जला एकादशीचा पाच पांडवांशी आहे 'हा' खास संबंध

Nirjala Ekadashi 2023 : निर्जला एकादशीचा पाच पांडवांशी आहे ‘हा’ खास संबंध

Subscribe

प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी (Ekadashi) म्हटले जाते. उद्या (31 मे) रोजी निर्जला एकादशीचे व्रत केले जाईल. निर्जला एकादशीचे व्रत केल्याने मागील अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. शिवाय या एकादशीला पाण्याचा थेंबही पिला जात नाही. त्यामुळे या एकादशीला निर्जला म्हटलं जातं. निर्जला एकादशीला श्री विष्णूंचे मनोभावे स्मरण केल्यास व्यक्तिच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतात. तसेच या दिवशी श्री विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

एकादशी तिथी

बुधवार, 31 मे 2023 रोजी निर्जला एकादशीचे व्रत केले जाईल. हिंदू पंचांगानुसार, ज्‍येष्‍ठ शुक्‍ल एकादशी आज 30 मे रोजी दुपारी 1:07 सुरु होणार असून 31 मे दुपारी 1:45 ला समाप्त होईल.

- Advertisement -

निर्जला एकादशीला ‘पांडव एकादशी’ का म्हटले जाते?

भगवान विष्णु (संरक्षक और रक्षक) - हिंदू भगवान - GoBookMartनिर्जला एकादशीला पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी देखील म्हटले जाते. यामागे एक पौराणिक कथा आहे. एके दिवशी श्री कृष्णांनी पाच पांडव आणि द्रौपदीला एकादशीचे व्रत करण्यास सांगितले होते, तेव्हापासून सर्वांनी एकादशीचे व्रत करायला सुरुवात केली. पण भीमला भूकेमुळे एकादशीचे व्रत कधीही करता आले नाही. यावेळी भीमला वाटले की, उपवास न केल्याने तो भगवान विष्णूचा अनादर करत आहे, तेव्हा भीमने आपल्या मनातील खदखद महर्षी व्यासांकडे व्यक्त केली. महर्षी व्यास म्हणाले की, निर्जला एकादशी व्रत वर्षातून एकदाच पाळल्यास सर्व 24 एकादशींचे व्रत केल्याचे फळ मिळते. तेव्हापासून निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी आणि पांडव एकादशी म्हणून ओळखले जाऊ लागले.


हेही वाचा :

शनीची साडेसाती सुरू आहे? शनिवारी करा ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini