घरभक्ती12 नोव्हेंबरला आहे संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

12 नोव्हेंबरला आहे संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

Subscribe

गणपती बाप्पाचा आर्शिवाद प्राप्त करायचा असेल तर संकष्टी चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी सगळ्यात उत्तम मानला गेला आहे. या महिन्यात 12 नोव्हेंबर रोजी संकष्टी चतुर्थी असणार आहे. या दिवशी केलेली पूजा-आराधना उत्तम मानली जाते.

संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त
संकष्टी चतुर्थी प्रारंभ : 11 नोव्हेंबर रात्री 8.17 पासून ते
संकष्टी चतुर्थी समाप्ती : 12 नोव्हेंबर रात्री 10.25 पर्यंत असणार आहे.
चंद्रोदय 8 वाजून 21 मिनिट

- Advertisement -

चंद्रोदयानंतर करा पारण
हिंदू मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदयानंतर सोडला जातो. संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यानंतर बाप्पाची पूजा केली जाते.

अशा प्रकारे करा संकष्टी चतुर्थीची पूजा
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. शुभ मुहूर्तावर श्री गणेशांचा अभिषेक करा. त्यांना चंदन, फळ, लाल फुल, धूप, दीप, दुर्वा, अक्षता, मोदक अर्पण करा. तसेच श्रीगणेश चालीसेचे पठण करा. श्रीगणेशांची आरती करा.रात्री चंद्रोदयानंतर व्रताचे उद्यापन करा.

- Advertisement -

 


हेही वाचा :

तुळशीच्या सुकलेल्या पानांमुळे बदलेल तुमचे भाग्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -