घरदिवाळी 2022दिवाळीच्या दिवशी अशाप्रकारे लावा घरामध्ये दिवे, येईल सुख-समृद्धी

दिवाळीच्या दिवशी अशाप्रकारे लावा घरामध्ये दिवे, येईल सुख-समृद्धी

Subscribe

हिंदू धर्मात सर्व सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दसरा झाला की सगळ्यांचे लक्ष दिवाळीकडे असते. दिवाळी भारतीयांचा सर्वात आवडता सण समजला जातो. यंदा 24 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल. या वर्षी नरक चतुदर्शी आणि दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते, तर दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते आणि तिसऱ्या दिवशी दिवाळी मात्र यंदा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. त्यामुळे या दिवशी विशेष योग असणार आहेत.

पौराणिक परंपरेनुसार, दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री गणेशांची पूजा केली जाते. असं म्हणतात की, दिवाळीच्याच दिवशी श्रीराम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत आले होते. त्यामुळे अयोध्येतल्या नागरिकांनी आनंद साजरा केला होतो. मात्र या दिवशी अश्विन अमावस्या असल्याने रात्री सगळीकडे अंधार होता. त्यामुळे अयोध्येतल्या लोकांनी मातीचे दिवे लावून सर्व अयोध्या प्रकाशमय करत श्रीरामांचे स्वागत केले. तेव्हापासून हा सण प्रत्येक वर्षी साजरा केला जातो.

- Advertisement -

दिवाळीच्या दिवशी घराबाहेर तसेच घरामध्ये मातीचे दिवे लावले जातात. या दिवांच्या प्रकाशामुळे घरामध्ये सुख-समृद्धी येते आणि त्यांचा आर्शिवाद देखील तुम्हाला प्राप्त होतो. अशामध्ये दिवाळीच्या दिवशी नेमकी किती आणि कोण-कोणत्या ठिकाणी दिवे लावावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

- Advertisement -
  • घरामधील सर्वात पहिला दिवा घरातील देवघरामध्ये ठेवा, जर तुमचे देवघर ईशान्य दिशेला नसेल तर त्या जागी देखील लावा.
  • त्यानंतर दुसरा दिवा तुळशीजवळ लावा. त्यानंतरचा दिवा स्वयंपाक घरात लावा.
  • घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर देखील दोन दिवे लावा.
  • घरातील वायव्य दिशेला आणि दक्षिण दिशेला देखील एक दिवा लावायला हवा. दक्षिण दिशा यम देवीची मानली जाते. यामुळे तुम्हाला पूर्वजांचा आर्शिवाद देखील प्राप्त होतो.
  • घरातील एक दिवा सोने-चांदी ठेवण्याच्या ठिकाणी देखील लावू शकता.

 


हेही वाचा :

लक्ष्मी पूजन कसे करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -