नागपंचमीच्या दिवशी बनणार ‘हे’ 2 दुर्मीळ योगायोग, विधीवत पूजा केल्यास होणार मनोकामनापूर्ती

या वर्षी नाग पंचमी मंगळवार,२ ऑगस्ट रोजी आहे. तसेच श्रावणातल्या मंगळवारी मंगळवारी सुद्धा साजरी केली जाते. त्यामुळे या नाग पंचमीला नाग देवतेसोबतच भगवान शिव, देवी पार्वतीची देखील पूजा केली जाईल.

श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. हिंदू धर्मात नागपंचमीचं विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. हिंदू धर्मात पौराणिक काळापासून नाग देवतेला पूजनीय मानले जाते. त्यामुळे श्रावणात हा सण साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेच्या प्रतिमेवर दूध अर्पण केले जाते आणि तसेच त्यांची पूजा-आराधना ही केली जाते. या वर्षी नागपंचमीचा सण २ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. तसेच या दिवशी एक खास संयोग सुद्धा बनणार आहे.

या वर्षी नागपंचमी मंगळवार,२ ऑगस्ट रोजी आहे. तसेच श्रावणातल्या मंगळवारी मंगळवारी सुद्धा साजरी केली जाते. त्यामुळे या नागपंचमीला नाग देवतेसोबतच भगवान शिव, देवी पार्वतीची देखील पूजा केली जाईल. ज्योतिषांच्या मते हा एक दुर्लभ संयोग आहे आणि यामध्ये विधिवत पूजा केल्यास तुम्हाला याचे अधिकपट फळ प्राप्त होईल.

नागपंचमीच्या दिवशी दोन शुभ संयोग
या वर्षी नागपंचमीच्या दिवशी दोन शुभ योग बनणार आहेत. २ ऑगस्ट रोजी नागपंचमी शिव योग आणि सिद्धि योगामध्ये साजरी केली जाईल. या दिवशी संध्याकाळी ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत शिव योग राहिल. त्यानंतर सिद्धि योग सुरू होईल. या मुहूर्तांमध्ये भगवान शिव आणि नाग देवता यांची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतील.

या पद्धतीने करा नागपंचमीची विधीवत पूजा
नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेचा फोटो किंवा मूर्ती घरी घेऊन या. त्याला घराच्या देवघराजवळ पाटावर त्याची स्थापना करा. त्यानंतर नाग देवतेला हळद-कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करून धूप-दीप लावून पूजा करा. लाह्या, बत्तासे, दूध नैवेद्य म्हणून अर्पण करा. त्यानंतर नाग देवतेची आराधना करा आणि नागपंचमीच्या कथेचे वाचन करा. त्यानंतर नाग देवतेची आरती करा.सोबतच भगवान शंकरांची सुद्धा आरती करा.


हेही वाचा :Hindu Shastra : श्रावणात चुकूनही करू नका ‘या’ चुका; नाहीतर व्रताचे मिळणार नाही फळ