रक्षाबंधन विशेष : भद्रा काळात रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही बांधू नका राखी नाहीतर होईल पश्चाताप

यावर्षी ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी केली जाईल. यावर्षी रक्षाबंधनाचा दिवस खूप खास असणार आहे. परंतु तुम्ही ऐकलं असेल की, रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा काळात राखी बांधणं अशुभ मानलं जातं.

श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधून त्याच्या दिर्घआयुष्याची कामना करते. या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला तिचं आयुष्यभर रक्षन करेन असं वचन देतो, तसेच बहिणीची आवडती वस्तू भेट म्हणून देतो. यावर्षी ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी केली जाईल. यावर्षी रक्षाबंधनाचा दिवस खूप खास असणार आहे. परंतु तुम्ही ऐकलं असेल की, रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा काळात राखी बांधणं अशुभ मानलं जातं.

भद्रा कोण आहे?
भद्रा काळामध्ये कोणत्याही प्रकारते शुभ कार्य करणं अशुभ मानलं जातं. शास्त्रातील विद्वानांच्या मते, भद्रा शनीदेवांची बहिण आहे. म्हणजेच भद्रा सूर्यदेवांती मुलगी आहे.

शूर्पणखाने रावणाला भद्रा काळामध्ये बांधली होती राखी
असं म्हणतात की, रावणाचे साम्राज्य संपण्यामागे हिच भद्रा वेळ आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी रावणाची बहिण शूर्पणखेने भद्रा काळात रावणाला राखी बांधली होती. ज्यानंतर लंकेच्या विनाशाला सुरूवात झाली होती.

रक्षाबंधन शुभ मुहूर्त

रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ मुहूर्तामध्ये राखी बांधणे लाभकारी मानले जाते.

  • अभिजीत मुहूर्त- त्यामुळे यावेळी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांपासून ते रात्री १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत असेल.
  • विजय मुहूर्त – दुपारी २ वाजून १४ मिनिटांपासून ते ३ वाजून ७ मिनिटांपर्यंत
  • राखी बांधण्याचा सर्वोत्तम मुहूर्त ११ ऑगस्ट, रात्री ८ वाजून ५२ मिनिटांपासून ते ९ वाजून १४ मिनिटांपर्यंत आहे.

रक्षाबंधन भद्रा काळ

  • रक्षाबंधनाच्या दिवशी या अशुभ वेळेत चुकूनही बांधू नका राखी
  • ११ ऑगस्ट,  संध्याकाळी ५ वाजून १७ मिनिटांपासून ते ६ वाजून १८ मिनिटापर्यंत भद्रा काळाची सुरूवात होईल.
  • तर संध्याकाळी ६ वाजून १८ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ५१ मिनिटांपर्यंत भद्रा काळ समाप्त होईल.

हेही वाचा :रक्षाबंधन विशेष : भावासाठी चुकूनही घेऊ नका अशी राखी, का? ते वाचा