शनी जयंतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘या’ गोष्टींचे दान; संपूर्ण वर्षभर मिळणार फायदा

हिंदू धर्मात शनी जयंतीला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. तसेच ज्योतिष शास्त्रातही शनि ग्रहाला खूप प्रवाभी ग्रह मानले जाते. शनी देव हे न्यायाचे दैवत आहेत. ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते. यावर्षी ३० वर्षानंतर शनी देव शनी जयंतीच्या दिवशी कुंभ राशीमध्ये असतील. अशावेळी शनी जयंतीला कोणत्या राशच्या लोकांनी कोणते दान करावे हे जाणून घ्या.

शनी जयंतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘या’ गोष्टींचे दान

मेष
शनी जयंतीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी राईचे तेल आणि काळे तीळ दान केल्याने त्यांना आधिक फायदा होईल.

वृषभ
वृषभ राशीच्या लोकांनी शनी जयंतीला शनी मंदिरात जाऊन शनी चालीसेचे पठण करा. शक्य असेल तर काळी चादर एखाद्या गरजूला दान करा.

मिथुन
मिथुन राशीचे लोक शनी जयंतीच्या दिवशी काळे कपडे परिधान करा.

कर्क
कर्क राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती चालू आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी शनी देवांची पूजा- आराधना , दान करा. यादिवशी उडीद डाळ, तेल, आणि तिळ दान करणे शुभ असेल.

सिंह
सिंह राशीच्या लोकांनी शनी जयंतीला ॐ वरेण्याय नमः मंत्राचा जप करा.

कन्या
शनि जयंतीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी गरजू व्यक्तींना छत्री, चप्पल दान करणे उत्तम असेल.

तूळ
तूळ राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी गरीबांना काळ्या रंगाचे कपडे, छत्री आणि राईचे तेल दान करा.

वृश्चिक
वृश्चिक राशीवर सध्या शनीची साडेसाती आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी शनी जयंतीला लोखंडाच्या वस्तू दान कराव्या.

धनू
धनू राशीच्या लोकांनी शनी जयंतीला ‘ऊँ प्रां प्रीं प्रौं सः शनये नमः’ मंत्राचा जप करावा.

मकर
मकर राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती आहे, त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी शनी जयंतीला पशु-पक्षांना पाणी, धान्य दान करा.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांवर सुद्धा शनीची साडेसाती चालू आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी आजारी व्यक्तींची मदत करा.

मीन
मीन राशीच्या लोकांवर सुद्धा शनीची साडेसाती चालू आहे. त्यामुळे या शनि जयंतीच्या दिवशी तूप, राईचे तेलाचे दान करा.