घरभक्तीसफला एकादशीला बनतोय 'या' तीन ग्रहांचा अद्भुत संयोग

सफला एकादशीला बनतोय ‘या’ तीन ग्रहांचा अद्भुत संयोग

Subscribe

प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी म्हटले जाते. धर्मशास्त्रानुसार, सफला एकादशीचे व्रत केल्याने मागील अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. सोमवार, 19 डिसेंबर रोजी सफला एकादशीचे व्रत आणि पूजा केली जाईल. 2022 मधील ही शेवटची एकादशी आहे. तसेच या दिवशी तीन अद्भूत संयोग देखील बनणार आहेत.

सफला एकादशीच्या दिवशी ग्रह-नक्षत्रांचा अद्भूत संयोग
मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला म्हणजेच सफला एकादशीच्या दिवशी बुध, शुक्र आणि शनी ग्रह मिळून लक्ष्मी नारायण योग आणि बुधादित्य योग आणि त्रिग्रही योग बनवत आहेत. या तीन शुभ योगांना ज्योतिष शास्त्रामध्ये खूप शुभ मानले जातं.

- Advertisement -

सफला एकादशी 2022 तिथी, शुभ मुहूर्त
हिंदू पंचागानुसार, सफला एकादशीची सुरुवात सोमवार, 19 डिसेंबर रोजी पहाटे 3:32 पासून ते मंगळवार, पहाटे 2:32 पर्यंत असणार आहे.

सफला एकादशीची अशा प्रकारे करा पूजा

- Advertisement -

Saphala Ekadashi 2022 | saphala ekadashi puja vidhi सफलता एकादशी, साल के अंत में सफलता दिलाने वाली एकादशी, मुहूर्त और महत्व जानें

  • सफला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्य देवाला अर्घ्यअर्पण करावे.
  • घरातील देवी-देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी. धूप-दीप लावून त्यांची आरती करावी.
  • पूजा पूर्ण झाल्यावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा, तसेच विष्णूच्या स्तोत्रांचे पठण करा.
  • भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा.

हेही वाचा :

Vastu Tips : रात्री शांत झोप लागत नाही? मग करा ‘हे’ वास्तू उपाय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -